गुजराती रुखी समाज बहुउद्देशीय सामाजिक संस्था मेहतर समाज पंढरपूर यांच्यावतीने पूरग्रस्तांना शिधावाटप

गुजराती रुखी समाज बहुउद्देशीय सामाजिक संस्था मेहतर समाज, पंढरपूर यांच्यावतीने पूरग्रस्तांना शिधावाटप

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूची मदत करण्याचे केले होते आवाहन

पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज – गुजराती रुखी समाज बहुउद्देशीय सामाजिक संस्था मेहतर समाज, पंढरपूर यांच्या वतीने पूरग्रस्त कुटुंबीयांना शिधावाटप करण्यात आले.सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे सामाजिक संस्थांना पूरग्रस्त लोकांना जीवनावश्यक वस्तूची मदत करण्याचे आवाहन केले होते.

जिल्हाधिकार्यांच्या आवाहनानुसार गुजराती रुखी समाज बहुउद्देशीय सामाजिक संस्था मेहतर समाज यांनी नवरात्र उत्सवामध्ये होणारा इतर खर्च टाळून समाज स्थापनेचा 50 वा सुवर्ण महोत्सव सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टीने अनेक कुटुंब उध्वस्त झालेले आहेत या कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू देण्याकरिता एक दिवसाचा पगार या पुरग्रस्त बांधवांना देऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचा निर्णय मेहतर समाजातील बांधवांनी घेतला .

त्याप्रमाणे गहू पीठ, तांदूळ, साखर,चटणी,गोडतेल, या जीवनावश्यक वस्तू देण्याबाबतचा निर्णय समाजाच्या बैठकीत झाला. कारण आपणही पुरग्रस्त आहोत पुराचे चटके आम्हीही झेललेले आहेत याची जाणीव ठेवून समाजाच्या बैठकीमध्ये एकमताने पूरग्रस्त कुटुंबीयांना शिधावाटप करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार आज माढा तालुक्यातील उंदरगाव मध्ये पुरग्रस्त बांधवांना गुजराती रुखी समाज बहुउद्देशीय सामाजिक संस्था मेहतर समाज व अखिल भारतीय सफाई मजदूर युनियन यांच्या वतीने शिधा वाटप करण्यात आले.

या गावातील माता भगिनींनी व गावकऱ्यांनी पुरात सर्व वाहून गेलेले आहे हि सर्व व्यथा सांगताना माता भगिनींच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले होते.यावेळी गुजराती रुखी समाज बहुउद्देशीय सामाजिक संस्था मेहतर समाज अखिल भारतीय सफाई मजदूर संघटनेचे पदाधिकारी गुरु दोडिया, काशिनाथ सोलंकी, महेश गोयल, अंबादास गोयल,आदित्य मेहडा योगेश मेहडा, सुरेश गोवर्धन वाघेला,दीपक वाघेला विक्रम वाघेला,प्रमोद मेहडा आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Back To Top