भंडीशेगाव मंडल अतिवृष्टी भरपाईतून वगळले; शेतकऱ्यांचा संताप – आंदोलनाचा इशारा

भंडीशेगाव मंडल अतिवृष्टी भरपाईतून वगळले; शेतकऱ्यांचा संताप – आंदोलनाचा इशारा

अतिवृष्टीग्रस्त यादीत भंडीशेगाव मंडलाचा समावेश न करता हा विभाग वगळल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी

शेळवे /संभाजी वाघुले/ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर तालुक्यात यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांतील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तरीसुद्धा शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या अतिवृष्टीग्रस्त यादीत भंडीशेगाव मंडलाचा समावेश न करता हा विभाग वगळल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

भंडीशेगाव मंडलातील शेतकरी काढणार रुमणे व रास्ता रोको ही करणार

भंडीशेगाव मंडळातील शेतकरी आता रस्त्यावर उतरत रस्ता रोकोही करणार असल्याची आर्त हाक दिली आहे.कारण भंडीशेगाव मंडलातील पर्जन्यमापक हे नेहमी चुकीचे पर्जन्यमाप दाखवत असल्याचे सिद्ध झालेले आहे.या अगोदरही अशीच घटना घडलेली आहे व आता ही अशीच घडलेली आहे.या भागात पाऊस पडुन झालेले नुकसान होऊनही या मंडलात पाऊस पडलाच नाही अशी गत झाली आहे.

भंडीशेगाव मंडल वगळण्यात आलेले आहे मागेही एकदा पर्जन्यमापक यंत्र बंद पडले म्हणून पीक विम्याच्या भरपाईपासून भंडीशेगाव मंडल,भाळवणी मंडल वंचित ठेवलं गेलं होतं.प्रत्येक वेळेस सरकारकडून भंडीशेगाव आणि भाळवणी मंडलावरती अन्याय होत आहे,

भंडीशेगाव मंडलातील शेळवे,भंडीशेगाव, खेडभाळवणी या गावांमध्ये अतिवृष्टीमुळे डाळिंब, द्राक्ष,केळी,ऊस,मका यासह इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतमालाचे नुकसान,चाऱ्याची टंचाई आणि आर्थिक संकटामुळे शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत हालाखीची झाली आहे.

शेळवे गावातील शेतकऱ्यांनी सांगितले की, पंढरपूर तालुक्यात सर्वाधिक पाऊस भंडीशेगाव मंडलात झाला. तरी शासनाने या विभागाला भरपाई योजनेतून वगळले आहे, हे अन्यायकारक आहे. शासनाने तातडीने दखल घेऊन भंडीशेगाव मंडल अतिवृष्टीग्रस्त घोषित करून भरपाई द्यावी,अशी मागणी त्यांनी केली आहे.

या निर्णयाविरोधात शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप असून शासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास भंडीशेगाव मंडलातील शेतकरी आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.

शेतकऱ्यांच्या मुख्य मागण्या:

  1. भंडीशेगाव मंडलाला अतिवृष्टीग्रस्त घोषित करावे
  2. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ भरपाई द्यावी
  3. पंचनामे तातडीने करून नुकसान भरून काढावे आमच्या हक्‍काच्या भरपाईपासून आम्हाला वंचित ठेवले तर आम्ही रस्त्यावर उतरण्या शिवाय पर्याय नाही,असा इशारा स्थानिक शेतकऱ्यांनी दिला आहे.

Leave a Reply

Back To Top