आयपीएस अधिकारी वाय पुरणकुमार आत्महत्येची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

हरियाणाचे दलित आयपीएस अधिकारी वाय पुरणकुमार यांच्या आत्महत्येची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी -केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.10 – हरियाणाचे दलित आयपीएस अधिकारी वाय पुरणकुमार यांनी आत्महत्येची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.

हरियाणाचे दलित आयपीएस अधिकारी वाय पुरणकुमार हे राष्ट्रपती पदक विजेते आयपीएस अधिकारी होते.त्यांची कामगिरी चांगली होती.अनेक ठिकाणी दलित अधिकाऱ्यांना जातीवादातून टार्गेट करून त्यांच्यावर अन्याय केला जातो. त्यांचा मानसिक छळ होतो. दलित अधिकाऱ्यांवर दबाव आणून कामाचा ताण वाढविला जातो असे अनेक प्रकार घडतात.त्यामुळे हरियाणाचे दलित आयपीएस अधिकारी वाय पुरणकुमार यांच्या आत्महत्येची सखोल चौकशी झाली पाहिजे.त्यांच्या आत्महत्येचे काय कारण आहे ते शोधुन काढले पाहिजे.त्यांच्या आत्महत्येस जे जबाबदार असतील त्यांच्या वर कठोर कारवाई झाली पाहिजे.ॲट्रोसिटी ॲक्ट नुसार कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केली आहे.

आयपीएस अधिकारी पुरणकुमार राष्ट्रपती पदक विजेते उत्कृष्ठ अधिकारी होते.त्यांच्या वर अशी आत्महत्येची वेळ येणे ही चिंताजनक दुःखद बाब आहे.वाय पुरणकुमार यांच्या आत्महत्येची सखोल चौकशी केली पाहिजे. दोंषीवर कठोर कारवाई झाली पाहिजे.या प्रकरणी आपण हरियाणाचे मुख्यमंत्री साहेबसिंह सैनी यांच्याशी बोलणार आहोत. मयत अधिकारी वाय पुरणकुमार यांना आपण न्याय मिळवून देणार आहोत असे ना.रामदास आठवले म्हणाले.

Leave a Reply

Back To Top