परंतु शासनाला केवळ पाडापाडीचीच घाई असून सकारात्मक विधायक कामात विशेष रस नसल्याचे दिसत आहे

दूधपंढरीची जागा शासनाने काँरिडाँर पर्यायी प्रकल्पासाठी अथवा पुनर्वसनासाठी विकत घ्यावी

परंतु शासनाला केवळ पाडापाडीचीच घाई असून सकारात्मक विधायक कामात विशेष रस नसल्याचे दिसून येते

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१०/१०/२०२५- पंढरपूर इसबावी येथील जिल्हा दुध संघाची दूधपंढरीची जागा गेल्या काही वर्षांपासून विक्री प्रतिक्षेत होती.मागील निविदा प्रक्रियेत अपेक्षित बोली आली नव्हती. आता अठ्ठावीस कोटींची बोली फायनल होण्याची शक्यता आहे.

वास्तविक पाहता पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची वाढती व्याप्ती,कॉरिडार पर्यायी प्रकल्प किंवा पुनर्वसन यासाठी अशा अनेक जागा शासनाने घेऊन ठेवणे गरजेचे आहे.बचाव समितीने शासनाला बरेच कॉरिडारपर्यायी अगर पुनर्वसन उपयोगी अनेक मोकळ्या व बिगर उपयोगी जागा शासनाचे भूमीसंपादन अधिकारी श्री.देशमुख यांना समक्ष दाखविल्या होत्या. त्यात ही दूधपंढरीचीही जागा दाखविली होती व शासनाने विकत घ्यावी अशी मागणीही त्यांच्यापाशी केली होती.तेसुध्दा ही निविदा प्रक्रिया सुरु होण्याच्या पूर्वीच.
परंतु शासनाला केवळ पाडापाडीचीच घाई झाली असून सकारात्मक विधायक कामात विशेष रस नसल्याचे याबाबत काही कृती झाली नाही यावरून दिसून येते.

अजून ही वेळ गेलेली नाही.शासनाने यात हस्तक्षेप करुन अठ्ठावीस कोटींना ही जागा विकत घ्यावी.तेवढी रक्कम शासनाला मुळीच जड नाही.शासन हे करु शकते असा पंढरपूरचाच इतिहास आहे.MTDC चे पर्यटक निवास असेच त्याकाळी विक्रीस निघाले होते.कोणाची तरी निविदा पण मंजूर होणार होती.तेंव्हा तत्कालीन आमदार कै. पांडुरंगराव डिंगरे यांच्या प्रयत्नांनी ते पर्यटक निवास मंदिर समितीला मिळाले.तसा प्रयत्न याकामी शासन,कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी, राज्यकर्ते यांनी करावा म्हणजे शासनाला खर्या अर्थाने बाधितांविषयी काही सहानुभूती आहे हे दिसून येईल.नपेक्षा केवळ पाडापाडीचीच घाई आहे असे दिसून येईल असे आवाहन पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीचे अध्यक्ष अभयसिंह इचगांवकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Leave a Reply

Back To Top