पंढरपुर पुणे रोडवर अतिवृष्टी नुकसान भरपाई निधीतून वगळलेच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन

पंढरपुर पुणे रोडवर अतिवृष्टी नुकसान भरपाई निधीतून वगळले च्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन

शेळवे/संभाजी वाघुले/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि. १०/१०/२०२५ –पंढरपूर पुणे महामार्गावरील बाजीरावच्या विहिरी जवळ आज भंडीशेगाव मंडल अतिवृष्टी नुकसान भरपाई निधीतून वगळले च्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनासाठी भंडीशेगाव मंडलातील शेळवे,वाखरी,खेड भाळवणी,कौठाळी, वाडीकुरोली,पिराची कुरोली,गादेगाव, भंडीशेगाव येथील शेतकरी बंधू भगिनी मोठ्या संख्यने उपस्थित होते.

घोषणाबाजी करत सर्व शेतकऱ्यांनी सरकारविषयी आपला तीव्र असंतोष व्यक्त केला. कोणतीही हुल्लडबाजी न करता शांततेत आणि संविधानिक पद्धतीने आपल्या मागण्या मांडल्या.कायदा सुव्यवस्था व आंदोलनाची दखल घेणेसाठी पंढरपूर पोलिस स्टेशन चे पोलिस व अधिकारी यांनी चोख बंदोबस्त लावला होता. त्याचबरोबर पंढरपूर चे तहसीलदार सचिन लंगुटे यांनी जातीने उपस्थित राहून शेतकऱ्यांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले .

सोशल मिडियाच्या माध्यमातून भंडीशेगाव मंडल अतिवृष्टी नुकसान भरपाई निधीमध्ये समाविष्ट केलं असल्याच्या बातम्या फिरत आहेत मात्र त्या लोकांनी किंवा संबंधित अधिकाऱ्यांनी आजच्या आंदोलन स्थळी उपस्थित राहून तशा प्रकारच्या जीआर ची प्रत,लेखी आश्वासन का दिले नाही, तहसीलदार उपस्थित राहिले मंत्री महोदयांनी फोन केला मात्र स्पष्टता झाली नाहीच.

म्हणजेच हे फक्त तोंडी आदेश आहेत,त्याला काही किंमत नसते अशा सर्वसामान्य शेतकरी व आंदोलकांमधून चर्चा होत आहे.

महाराष्ट्र राज्याचे कृषि मंत्री दत्ता भरणे व पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी फोन करुन पंढरपूर तालुक्यातील सर्व गावांचा अतिवृष्टी नुकसान भरपाई योजनेत समावेश केल्याचे सांगितले मात्र बहुसंख्य शेतकरी लेखी जीआर आणि तसें पत्र पाहिजे या आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.तीन दिवसात जर का भंडीशेगाव मंडलाचा समावेश असलेला जी आर नाही मिळाला तसेच सरकट नुकसान भरपाई रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात नाही झाली तर तहसील ऑफिस पंढरपूर समोर उग्र आंदोलन करण्याच्या इशारा सर्वसामान्य शेतकरी आंदोलकांनी दिला आहे.कारण परिस्थिती खूप बिकट आहे,शेतकऱ्यांचे प्रपंच रस्त्यावर आले आहेत,जनावरे रोगराई मुळे मरू लागली आहेत.शेतकरी संतप्त होईपर्यंत प्रशासनाने वाट पाहू नये कारण परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते तरी परिस्थितीचे गांभीर्य वेळीच प्रशासनाने ओळखले पाहिजे.शासन आणि प्रशासनाने बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या हुशार आणि चाणाक्ष पोरांना ठोस लेखी आदेश किंवा अधिकृत पत्र द्यावे आता पुन्हा पुन्हा फसवण्याचा प्रयत्न करू अशी भावना व्यक्त केल्या आहेत.

Leave a Reply

Back To Top