मुक्त सुरक्षित वावरासाठी या परिसरात सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी घालावी -हिंदु महासभा,तीर्थक्षेत्र बचाव समिती

पंढरपूरात भाविक सुरक्षा धोक्यात ?

मुक्त सुरक्षित वावरासाठी या परिसरात सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी घालावी -हिंदु महासभा,तीर्थक्षेत्र बचाव समिती

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.११/१०/२०२५ –दिवसेंदिवस पंढरपूरात दर्शनासाठी येणाऱ्या वारकरी भाविकांची संख्या वाढत आहे मात्र त्यांची सुरक्षितता धोक्यात येत असून मंदिर सुरक्षा पोलीस यंत्रणा कमी पडत असल्याचे दिसून येत आहे.मंगळवारी सात तारखेला दुचाकी गाडीचा धक्का लागला यासारख्या किरकोळ कारणास्तव भाविकाच्या डोक्यात दगड ,किटली घालून जखमी केल्याचे कृत्य घडले आहे.ही घटना तीव्र निंदनीय असून हिंदुमहासभा व तीर्थक्षेत्र बचाव समिती पंढरपूर याचा तीव्र निषेध करीत आहे. वास्तविक अशा घटनांमुळे पंढरपूर चे नाव बदनाम होत आहे.भाविकांना लुटण्याच्या घटना घडत आहेत.याचाही बंदोबस्त होणे गरजेचे आहे.

प्रशासन याबाबतीत पूर्ण उदासीन राहिले आहे.काही महिन्यांपूर्वी असेच केंद्रीय मंत्री ताफा वाहनाने एका भाविक मुलीला जखमी केले होते.मंदिर परिसरात भाविक हा वेगळ्याच भावावस्थेत असतो.त्याला मुक्त सुरक्षित वावरण्यासाठी या परिसरात सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी घालणे आवश्यक आहे.मंदिर परिसर हा केवळ पायी चालण्यापुरताच मर्यादित राहिला पाहिजे रस्तारूंदी पूर्वी होता तसा.तरच भाविक सुरक्षित राहील.या आरोपींवर कडक कारवाई व्हावी व जखमींना सरकार व मंदिर समितीने उपचारासाठी मदत करावी असे आवाहन हिंदुमहासभेचे शहर अध्यक्ष विकास मोरे,तीर्थक्षेत्र बचाव समितीचे उपाध्यक्ष माउली महाराज गुरव व अभयसिंह इचगांवकर यांनी केले आहे.

हिंदुमहासभा,तीर्थक्षेत्र बचाव समिती, पंढरपूर मंदिर परिसर हाणामारी,मारहाण प्रकरण,

Leave a Reply

Back To Top