मोडी लिपी प्रशिक्षण परीक्षेत तानाजी मोळक यांनी चांगले मार्क्स मिळवून घवघवीत यश संपादन केले

मोडी लिपी प्रशिक्षण परीक्षेत पंढरपूर येथील तानाजी मोळक यांनी चांगले मार्क्स मिळवून घवघवीत यश संपादन केले

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – महाराष्ट्र शासनाच्या मार्फत पुराभिलेख संचानालय विभाग यांच्यावतीने मुंबई विभागीय मार्फत व्ही.जे.शिवदारे कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स सोलापूर येथे घेण्यात आलेल्या मोडी लिपी प्रशिक्षण परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला.

या परीक्षेत पंढरपूर येथील तानाजी किसन मोळक यांनी चांगले मार्क्स मिळवून घवघवीत यश संपादन केले. त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. इ.स. 13 व्या शतकापासून ते 1960 पर्यंत महाराष्ट्रातील प्रशासन, न्यायप्रणाली, करप्रणाली आणि व्यापाराचे असंख्य दस्तऐवज मोडी लिपीत लिहिलेले आहेत.

Leave a Reply

Back To Top