कासा पोलीस ठाणे यांची अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या आरोपींवर कारवाई

मेफेड्रॉन (MD) या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या आरोपींवर कारवाई करून एकुण २,९६,४००/- रुपये किंमतीचे मेफेड्रॉन (MD) जप्त

कासा पोलीस ठाणे यांची अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या आरोपींवर कारवाई

पालघर/ ज्ञानप्रवाह न्यूज – पोलीस अधीक्षक यतिश देशमुख पालघर यांनी पालघर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांना सक्त सुचना दिलेल्या आहेत.

कासा पोलीस ठाणे हद्दीत दि.०८/१०/२०२५ रोजी कासा पोलीसांनी केलेल्या कारवाईत आरोपी विद्या स्वप्नील सरवणकर वय २९ वर्ष,रा.रुम नं. ११० जिवदानी रहिवाशी संघ, रामनगर धारखडी दहिसर पूर्व मुंबई,भरत प्रदिप जोशी वय ३२ वर्ष, रा.भाग्यश्री पार्क रुम नं.१०३ सालासरज्योत जनता नगर रोड भाईंदर पश्चिम मुंबई या दोन आरोपीतांनी त्यांचे स्वतःचे ताब्यात एकुण २,९६,४००/- रुपये किंमतीचे १४.८२० ग्रॅम वजनाचे एम.डी. (मेफेड्रॉन) अंमली पदार्थ तसेच एम.डी. (मेफेड्रॉन) अंमली पदार्थ मोजमाप करण्यासाठीचे ईलेक्ट्रिक वजनकाटा ताब्यात बाळगुन चारोटी नाका येथे डहाणुकडे जाणारे रोडवर विक्री करण्याच्या उद्देशाने मिळुन आले.

त्यामुळे सदरबाबत वर नमूद आरोपींविरूध्द कासा पोलीस ठाणे येथे गु.र.नं.॥ १४१/ २०२५ एन.डी.पी.एस.कायदा कलम ८ (क), २२ (ब),२९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्ह्यात दोन्ही आरोपीस अटक केलेली असून पुढिल तपास हा पोनि/अविनाश मांदळे प्रभारी अधिकारी कासा पोलीस ठाणे हे करत आहेत.

सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक, यतिश देशमुख पालघर,अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे पालघर, उपविभागीय पोलीस अधिकारी समिर मेहेर जव्हार विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोनि/अविनाश मांदळे प्रभारी अधिकारी कासा पोलीस ठाणे,पोउपनि/पंकजकुमार चव्हाण, पोहवा प्रदिप गोवारी,पोहवा संदिप चव्हाण, मपोहवा प्रेमलता रिंजड,मपोअं अंजना ठाकरे,चालक पोअं योगेश भोसले सर्व नेमणुक कासा पोलीस ठाणे यांनी केली.

Leave a Reply

Back To Top