खासदार प्रणिती शिंदे यांची हंजगी गावाला भेट,राहिलेले पंचनामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना

खासदार प्रणिती शिंदे यांची हंजगी गावाला भेट; राहिलेले पंचनामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना

आचेगाव–हंजगी पुलाची उंची वाढविण्यासाठी प्रयत्न करणार

अक्कलकोट/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१० ऑक्टोबर २०२५-सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी आज अक्कलकोट तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त हंजगी गावाला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेत त्यांनी ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि प्रशासनाला तातडीने राहिलेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी खासदार शिंदे म्हणाल्या, गावातील अजून काही पंचनामे प्रलंबित असतील तर ताबडतोब पूर्ण करावेत. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आम्ही तत्पर आहोत. सरकारकडून शक्य तितकी वाढीव मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करू. तसेच जर पंचनामे करण्यास शासकीय अधिकारी टाळाटाळ करत असतील तर थेट माझ्याशी संपर्क साधा असे आवाहन केले.

खासदार प्रणिती शिंदे यांनी आचेगाव ते हंजगी पुलाची उंची वाढविण्याबाबत प्रशासनाशी चर्चा करून स्थायी उपाय योजना करण्याचे आश्वासन दिले.

या भेटीदरम्यान युवक काँग्रेस अध्यक्ष निशांत कवडे, हंजगी सरपंच चनमलप्पा हालहोळे, अंबन्ना कोळी, प्रकाश मनुरे, विकास जाधव, राजू कोळी, निंगू पाटील, आनंदराव पाटील, महेश कोळी, संतोष पाटील, विशाल जाधव यांच्यासह शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Back To Top