मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे अध्यक्षतेखाली
श्रीपूर येथे कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांचा पुर्णाकृती पुतळा अनावरण सोहळा व १० हजार मे.टन विस्तारीकरण गाळप,पोटॅश निर्मिती प्रकल्पाचा शुभारंभ
पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१५/१०/२०२५- कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना लि,श्रीपूर येथे कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांचा पुर्णाकृती पुतळा अनावरण सोहळा आणि १० हजार मे.टन विस्तारीकरण गाळप, पोटॅश निर्मिती प्रकल्पाचा शुभारंभ बुधवार दि.१५/१०/२०२५ रोजी दुपारी २.३० वाजता होणार आहे.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे अध्यक्षतेखाली सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले,कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे,सहकारमंत्री बाबासाहेब पाटील,मा.उपमुख्यमंत्री मा.खा. विजयसिंह मोहिते-पाटील, अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य सहकार परिषद मा.आ.राजन पाटील (कॅबिनेटमंत्री दर्जा) यांच्या विशेष उपस्थितीत सोलापूर च्या खा.प्रणितीताई शिंदे,माढाचे खा.धैर्यशिल मोहिते-पाटील, करमाळाचे आ.नारायण पाटील, माळशिरसचे आ.उत्तम जानकर,मोहोळचे आ.राजु खरे, माढाचे आ.आभिजीत पाटील,मा.आ.दिपक साळुंखे-पाटील,मा.आ. यशवंत माने, आ. सुभाषबापु देशमुख, आ.दिलीप सोपल, मा.आ. रणजितसिंह मोहिते-पाटील, पंढरपूर मंगळवेढा चे आ. समाधान आवताडे, आ.देवेंद्र कोठे,मा.आ.रामहरि रुपनवर, मा.आ.संजयमामा शिंदे, मा.आ.शामलताई बागल, आ. विजयकुमार देशमुख, मा.आ.बबनदादा शिंदे,आ. सचिन कल्याणशेट्टी, आ.डॉ. बाबासाहेब देशमुख,मा.आ.सिध्दराम म्हेत्रे,मा.आ.दिलीप माने,मा.आ.राम सातपुते, मा.आ.डॉ.राम साळे,मा.खा. जयसिध्देश्वर स्वामी,मा.खा.रणजित नाईक निंबाळकर,मा. आ.प्रा.लक्ष्मण ढोबळे,मा.आ.राजेंद्र राऊत, मा.आ. शहाजी बापू पाटील,मा.आ.धनाजी साठे,मा.आ. जयवंत जगताप, मा.आ.दत्तात्रय सावंत सर,डॉ.संजय कोलते आयुक्त, दिपक तावरे सहआयुक्त यांच्या सन्माननीय उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
तरी या कार्यक्रमाला सन्माननीय सभासद, शेतकरी बांधव आणि ग्रामस्थांनी उपस्थिती दर्शवावी असे आवाहन या कार्यक्रमाचे निमंत्रक मा.आ. प्रशांत परिचारक चेअरमन
कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना लि,श्रीपूर,कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी, कैलास खुळे सर व्हा.चेअरमन कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना तसेच सर्व संचालक मंडळ,सभासद शेतकरी व कर्मचारी वृंद यांच्यावतीने करण्यात आले आहे.