राज्यातील ७.५ अश्र्वशक्ती पर्यंतच्या सर्व शेतीपंप ग्राहकांना शासनाकडून मोफत वीज
मुंबई,दि.२८ : राज्यातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना – २०२४ शासनाने लागू केली आहे.त्यामुळे आता ७.५ अश्र्वशक्ती पर्यंतच्या शेतीपंपाचा वापर करणाऱ्या राज्यातील सर्व शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार आहे.
जागतिक हवामान बदल आणि अनियमित पर्जन्यामुळे राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे. या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी शासनाने धोरण ठरविले. त्यानुसार आता एप्रिल २०२४ पासून मार्च २०२९ पर्यंत राज्यात मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना – २०२४ राबविण्यात येत आहे.तथापि या योजनेचा ३ वर्षांत आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.
या योजनेमुळे, सध्या देण्यात येणारे वीज दर सवलतीचे ६,९८५ कोटी रुपये तसेच वीज दर माफीनुसार ७,७७५ कोटी रुपये खर्च होणार आहे. त्यामुळे एकूण १४,७६० कोटी रुपयांची वीज दर माफी राज्यातील शेतकऱ्यांसाठी केली जात आहे.
याबाबतचा शासन निर्णय शासनाने जारी केला असून तो महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आला आहे.
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.