शनिपार चौकात मनसेच्या मी मराठी – माझी स्वाक्षरी मराठी उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद: हजारोंची मराठी स्वाक्षरी
Pune mns news: पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज: महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, पुणे शहर यांच्या वतीने शनिपार चौक, बाजीराव रस्ता येथे मी मराठी – माझी स्वाक्षरी मराठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.मराठी भाषेच्या जतन व संवर्धनासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी सुमारे 3000 ते 35000 हून अधिक आबालवृद्धांनी भव्य फलकावर मराठीमध्ये स्वाक्षरी करून सहभाग नोंदवला. मराठीत स्वाक्षरी करणाऱ्या प्रत्येकाला पेढा देऊन गौरविण्यात आले.
उपक्रमाला मनसे नेते अनिल शिदोरे, शहराध्यक्ष साईनाथ बाबर, संघटक प्रल्हाद गवळी, प्रदेश सरचिटणीस गणेश सातपुते, रणजित शिरोळे, किशोर शिंदे, बाळा शेडगे, प्रवक्ते योगेश खैरे, शहर उपाध्यक्ष आशिष देवधर, मनविसेचे प्रशांत कनोजिया,सचिन पवार,केदार चितळे,नगरसेविका स्वप्नाली पंडीत,वर्षा तापकीर,महेश वाबळे आदी मान्यवरांनी भेट दिली.
मनसे शहर सचिव वसंत खुटवड आणि मनविसे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य सारंग सराफ यांनी उपक्रमाचे आयोजन केले. रुपेश चांदेकर, करण मेहता, ऋषिकेश करंदीकर, प्रमोद उमरदंड, राहूल मुंगले, शुभम मुळे यांनी सहकार्य केले.
यंदा या उपक्रमाचे १७ वे वर्ष होते. कॅलिग्राफी कलाकारांच्या सहभागामुळे कार्यक्रम अधिक आकर्षक ठरला. या माध्यमातून मराठी भाषेचे महत्त्व आणि महती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
