भगवान बुध्दांच्या बहुजन हिताय बहुजन सुखाय या उपदेशातच लोकशाहीचा उगम – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
छत्रपती संभाजीनगर जागतिक धम्म परिषद; आठवले यांची ७५ लाखांच्या निधीची घोषणा
छत्रपती संभाजीनगर/मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७ : महाकारुणीक Gautama Buddha यांनी दिलेल्या बहुजन हिताय, बहुजन सुखाय या उपदेशातच लोकशाहीची संकल्पना दडलेली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले Ramdas Athawale यांनी केले.

छत्रपती संभाजीनगर येथील भिमटेकडीवर आयोजित जागतिक बौद्ध धम्म परिषद उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. भारतीय विनय अलंकार धम्म ज्ञान प्रशिक्षण केंद्राच्या वतीने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
बौद्ध धम्मानेच जगाला लोकशाहीचा विचार दिला
ना.आठवले म्हणाले की,भिक्षू संघात वाद झाल्यास बहुमताचा निर्णय स्वीकारण्याची परंपरा होती. हीच लोकशाहीची मूळ संकल्पना आहे.महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर B.R. Ambedkar यांनी बौद्ध धम्माची दीक्षा देत भारतात धम्मचक्र प्रवर्तित केले आणि भारतीय राज्यघटनेद्वारे लोकशाही मजबूत केली.बौद्ध धम्मातील समता, बंधुता आणि करुणा या तत्वांवरच भारतीय लोकशाही आधारलेली असल्याचे त्यांनी सांगितले.
७५ लाख रुपयांची मदत जाहीर
भिमटेकडी येथील विनय अलंकार धम्म ज्ञान प्रशिक्षण केंद्रासाठी खासदार निधीतून टप्प्याटप्प्याने ७५ लाख रुपये देणार असल्याची घोषणा ना.रामदास आठवले यांनी केली. या धम्म परिषदेत 30 देशातील व भारतातील प्रमुख भिख्खु आणि भिख्खुनी उपस्थित होते. कल्याण काळे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.

या जागतिक बौध्द धम्म परिषदेच्या अध्यक्षस्थानी म्यानमारचे पुज्य भदंत डॉ. आशिन उत्तमतारा सयाडु उपस्थित होते. तसेच भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो हे जागतिक धम्म परिषदेच्या स्वागताध्यक्ष पदी उपस्थित होते.
यावेळी पुज्य भदंत हर्षबोधी महाथेरो (बुध्दगया) भदंत सिमादा पुशी महाथेरो (जपान) भदंत अजान अमनाथ महाथेरो (बॅकॉक) धम्म परिषदेच्या संयोजन समितीच्या कोअर कमिटीचे अध्यक्ष डॉ. अरविंद गायकवाड, तसेच भदंत सुगद शांती (बुध्दगया) मास्तर झेन (व्हिएतनाम) धम्म परिषदेच्या कोअर कमिटीचे उपाध्यक्ष अनिलकुमार बस्ते, अनिकेत ओवा,जोगेंद्र तायडे,दत्ता बनसोडे तसेच रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष बाबुराव कदम,, मिलींद शेळके, विजय मगरे, लक्ष्मण हिवराळे, दिलीप पाडमुख, बाळकृष्ण इंगळे,शरद शेगांवकर आदि मान्यवर उपस्थित होते. या धम्म परिषदेस मराठवाडयातील आणि छत्रपती संभाजी नगरमधील मोठया प्रमाणात धम्म उपासक आणि उपासिका उपस्थित होत्या.
भगवान बुध्दांनी दिलेला जगाला दिलेला बौध्द धम्म हा अखिल मानव जातीसाठी आदर्श जीवन मार्ग आहे. बौध्द धम्म हा मानवतावादी, विज्ञानवादी प्रज्ञा शिल करुणा, अहिंसा आणि विश्वशांतीचा विचार देणारा धम्म आहे असे गौरद्गार ना. रामदास आठवले यांनी काढले.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बौध्द धम्माची दिक्षा देवुन भारतात पुन्हा एकदा धम्मचक्र प्रवर्तीत केले. बोधीसत्व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेद्वारे भारताची लोकशाही मजबुत केली. बौध्द धम्मातल्या बहुजन हिताय, बहुजन सुखाय समता, बंधुता या तत्वावर आधारलेली आहे. जगाला सर्वप्रथम बौध्द धम्मानेच लोकशाहीचा विचार दिलेला आहे असे ना. रामदास आठवले म्हणाले. भिमटेकडी येथील विनय अलंकार धम्म ज्ञान प्रशिक्षण केंद्राला आपल्या खासदार निधीतुन 75 लाख रुपये टप्प्याटप्याने देणार असल्याची घोषणा ना.रामदास आठवले यांनी केली.
