भारतीय वाघिणींचा विश्वविजय दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवत भारताने पटकावला महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ – उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे


वाघिणींचा विक्रमी विजय भारतीय रणरागिणींची विश्वावर मोहोर -उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे

भारताचा विश्वविजय साकार,शेफाली- दिप्तीचा जादुई खेळ

हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली इतिहास घडला -भारत विश्वविजेता
Indian Tigresses Roar to Glory,Team India Crushes South Africa to Lift ICC Women’s World Cup 2025
मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,३ नोव्हेंबर २०२५-जय हो भारतीय वाघिणींची – आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ च्या अंतिम सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने इतिहास रचला आहे. उत्कंठावर्धक लढतीत दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवत भारताने विश्वविजेतेपदावर आपली दणदणीत मोहोर उमटवली.

दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीस पाठवले पण शेफाली वर्मा (८७), दिप्ती शर्मा (५८), स्मृती मनधाना (४५), रिचा घोष, जेमिमा रॉड्रिग्ज आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्या जबरदस्त फलंदाजीने भारताने २९९ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य उभे केले.

प्रतिउत्तरात आफ्रिकन फलंदाजांना भारतीय गोलंदाजांनी अक्षरशः गुडघ्यावर आणले.दिप्ती शर्मा आणि शेफाली वर्माने निर्णायक बळी घेत आफ्रिकन डावाचे चित्तथरारक पतन घडवले तर बाकीच्या गोलंदाजांनी संयम आणि नेमकेपणाने साथ दिली.
अखेरीस भारतीय संघाने जबरदस्त संघ भावना,जिद्द आणि तडफदार खेळीने आयसीसी महिला विश्वचषक २०२५ च्या विजेतेपदावर आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले.

विधानपरिषद उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी या ऐतिहासिक यशाबद्दल भारतीय महिला क्रिकेट संघाचे मनःपूर्वक अभिनंदन करत म्हटले,ही विजयकथा प्रत्येक भारतीयाच्या अभिमानाचा क्षण आहे.भावी वाटचालीसाठी संघाला हार्दिक शुभेच्छा.

