वाखरी जि.प.गटातून सुशिलाताई जगताप यांनी निवडणूक लढवावी- महिला वर्गासह मतदारांची मागणी

वाखरी जि.प.गटातून सुशिलाताई जगताप यांनी निवडणूक लढवावी – महिलावर्गासह मतदारांची मागणी

स्वच्छ नेतृत्व,मजबूत जनसंपर्क- सुशिलाताई जगताप यांचा वाखरीत विजय निश्चित

Sushilatai Jagtap Emerges as the People’s Choice from Vakhari ZP Group

पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,०३/११/२०२५- महाराष्ट्रातील सर्वच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले आणि जागोजागी निवडणूकीचे पडघम वाजु लागले.पंढरपूर तालुक्यातील वाखरी जि.प.गटाची जागा सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी राखीव झालेली असून अनेक इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

वाखरी ग्रामपंचायतीच्या सन २००० ते २००५ या कालावधीत सरपंचपद भुषवून सर्व कारभार स्वतः पाहिलेल्या श्रीमती सुशिलाताई जगताप यांनी येत्या जि.प. निवडणूकीच्या रिंगणात उतरावं आणि निवडणूक जिंकावी यासाठी महिला वर्गासह सर्वच स्तरांतुन त्यांना पाठिंबा मिळताना दिसत आहे. या अगोदर महिला काँग्रेस ता.अध्यक्ष पदाच्या कार्यकाळात संपूर्ण तालुक्यात जनसंपर्क वाढवला आहे. १९८४ साली दहावी उत्तीर्ण असलेल्या श्रीमती जगताप यांंनी सरपंच पदावर असताना स्वतः ५ वर्ष पुर्णवेळ कारभार पाहिला आहे. घरातील कोणीही त्या मध्ये हस्तक्षेप केला नव्हता.त्यांना संधी दिल्यास वाखरी जि.प.गटाचा सर्वांगीण विकास करतील अशी चर्चा मतदारांमधुन होत आहे.

सरपंच असताना पंढरपूर तालुक्यात संत गाडगे महाराज स्वच्छता अभियानमध्ये ग्रामपंचायतीला तालुक्यात सतत ५ वर्ष प्रथम क्रमांक,बिमा ग्राम योजनेत प्रत्येक कुटुंबाला विमा देण्याचे काम झाले.पंढरपूर येथे आधार महिला नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली असून त्या संस्थापक चेअरमन आहेत.बचत गटाच्या माध्यमातून महिलांना अर्थिक सक्षम करणे, लघु उद्योगास शासकीय योजना मिळवून देणे यासारखी कामे त्यांनी केली आहेत. यापूर्वी गुरसाळे जिल्हा परिषद गटामधून त्यांनी निवडणूक लढवली त्यावेळी त्यांना फक्त १४० मताने पराभूत व्हावे लागले होते. त्यावेळची सर्व गावे चालू ज़िल्हा परिषद गटात असून फक्त पटवर्धन कुरोली गणाचा समावेश झालेला आहे.साहजिकच जनसंपर्क व कामे या जमेच्या बाजू राहिलेल्या आहेत.वाखरी पंचक्रोशीमध्ये अजातशत्रू म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामूळे त्यांना सर्वच स्तरातून निवडणू कीसाठी पाठिंबा मिळत आहे. त्यांच्या सासू उमाबाई विठ्ठल जगताप या वाखरी गावच्या विद्यमान उपसरपंच आहेत.

सध्या जगताप कुटुंबीय आमदार अभिजित पाटील यांचे समर्थक म्हणून महत्वाची जबाबदारी पार पाडत आहेत. आबांनी बंद पडलेला विठ्ठल सहकारी कारखाना जोरदार चालवला व जिल्ह्यात उंच्चाकी दर दिलेला आहे त्यामुळे कारखानदारात स्पर्धा सुरु झाली आहे त्यामुळेच सर्वच कारखान्याचे सभासद, बळीराजा खुश आहे कारण आमदार अभिजीत पाटील यांच्यामुळे हे शक्य झाले आहे तसेच फक्त 3 महिन्यात 30 वर्षाची सत्ता असलेली माढा मतदार संघात उलथून टाकली आहे व विकास कामाचा झपाटा सुरु केलेला आहे त्यामुळे मतदारराजा खुश आहे.

श्रीमती सुशीलाताई जगताप यांचे जेष्ठ चिरंजीव भारतीय आयुर्विमा महामंडळात विकास अधिकारी या पदावर कार्यरत असून मराठा सेवा संघाचे सोलापूर जिल्हा संघटक आहेत.त्या माध्यमातून त्यांचा जनसंपर्क संपूर्ण तालुक्यात आहे. संघटनेच्या माध्यमातून सरकारी योजना ग्रामीण भागात पोचवण्याचे भरीव काम ते करत आहेत.कनिष्ठ चिरंजीव B.SC.Agri शेती क्षेञाशी संबंधित असुन डाळिंब निर्यातीत अग्रेसर आहेत.त्यांना डाळिंबरत्न पुरस्कार प्राप्त 2018 असून सध्या 100 एकर पेक्षा जास्त डाळिंब शेती करार पद्धतीने करत असुन संपूर्ण शेतमाल निर्यात करत आहेत.त्यातून त्यांनी अनेकांना रोजगार दिला आहे.

तसेच त्यांचा पुतण्या डॉ.अजित जगताप हे D.M. ENDOCRINOLOGY ही सोलापूर जिल्ह्यातील एकमेव पदवी प्राप्त आहेत तर सुनबाई शार्वी वांजळे-जगताप या M.D. Ped (Neuro) आहेत तसेच घरात 7 Engineer असलेल्या शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या जगताप कुटूंबाकडुन मतदारांना सर्वांगीण विकासाच्या अपेक्षा आहेत.

त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (श.प. )गटाकडून उमेदवारी मिळाल्यास आमदार अभिजित पाटील यांची लाट व स्वच्छ सुशीलाताई जगताप यांची पारदर्शी लोकप्रिय नेतृत्व यामुळे वाखरी जि.प.गटात विक्रमी विजय 100% शक्य मानला जात आहे.

Leave a Reply

Back To Top