सायबर फसवणुकीपासून सावध – पासवर्ड ट्रॅपमध्ये अडकू नका

सायबर फसवणुकीपासून सावध – पासवर्ड ट्रॅपमध्ये अडकू नका

Cyber Alert: Don’t Fall for Password Traps

नांदेड/ ज्ञानप्रवाह न्यूज – नांदेड पोलिसांनी नागरिकांना इशारा दिला आहे की कोणत्याही वेबसाइटवरील पॉप-अप जाहिरातींमध्ये किंवा Login, तुमचा फोन हॅक झाला आहे अशा घाबरवणाऱ्या संदेशांमध्ये आपला पासवर्ड कधीही टाकू नये.या लिंक हॅकर्सकडून बनवलेल्या असू शकतात आणि तुमची वैयक्तिक माहिती चोरू शकतात.

नांदेड पोलिसांनी सांगितले की प्रत्येक खात्यासाठी वेगळा,मजबूत आणि सुरक्षित पासवर्ड वापरावा. तसेच शक्य असल्यास दोन-घटक प्रमाणीकरण (2FA) सक्रिय ठेवावे, ज्यामुळे खात्याची अतिरिक्त सुरक्षा मिळते.

जर कोणतीही फसवणूक किंवा संशयास्पद लिंक आढळली तर लगेच तक्रार नोंदवावी:
www.cybercrime.gov.in
हेल्पलाइन: 1945
cybercell.pnr@mahapolice.gov.in

नांदेड पोलिसांनी आवाहन केले आहे की ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी आणि सर्वांनी ऑनलाइन सुरक्षिततेबद्दल जागरूक राहावे.

शेअर करा,सावध राहा आणि इतरांनाही सावध करा!

Leave a Reply

Back To Top