आत्मनिर्भर शेतकरी- स्वेरीच्या विज्ञान कार्यशाळेतून नव्या कृषी क्रांतीचा प्रारंभ

आत्मनिर्भर शेतकरी – स्वेरीच्या विज्ञान कार्यशाळेतून नवा कृषी क्रांतीचा प्रारंभ

From Soil to Self-Reliance – Sveris Workshop Ignites New Agri Revolution

जैविक खतांपासून आर्थिक स्वावलंबनाकडे – शेतकऱ्यांचा आत्मनिर्भर भारताकडे प्रवास

From Organic Solutions to Economic Empowerment – Farmers March Toward Self-Reliant India

स्वेरीत आत्मनिर्भर कृषी भारताची गाथा – दोन दिवसीय तंत्रज्ञान कार्यशाळेत शेतकऱ्यांचा नवप्रेरणादायी प्रवास

रासायनिक खतांना अलविदा, स्वनिर्मित जैविक खतांकडे शेतकऱ्यांचा वेगवान कल

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – आत्मनिर्भर आणि बलशाली कृषीप्रधान भारत या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी गोपाळपूर ता.पंढरपूर येथील स्वेरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये विज्ञान संत अंकुश पाटील तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यशाळा अत्यंत उत्साहात पार पडली.२ ते ३ नोव्हेंबर २०२५ या दोन दिवसांच्या कार्यशाळेत शेतकऱ्यांना जैविक खते आणि औषधे घरच्या घरी तयार करण्याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले.

या उपक्रमाच्या निमित्ताने राज्यस्तरीय पोशिंदा पुरस्कार सोहळा तसेच अनुभव कथन मेळावाही पार पडला.स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये दि.२ व ३ नोव्हेंबर २०२५ रोजी दोन दिवसीय, विज्ञान संत अंकुश पाटील तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यशाळा पार पडली. या निमित्ताने अनुभव कथन मेळावा आणि राज्यस्तरीय ‘पोशिंदा’ पुरस्कार सोहळा ही पार पडला.

या कार्यशाळेचे आयोजन विज्ञान संत अंकुश पाटील कृषी तंत्रज्ञान समिती महाराष्ट्र, जय जवान-जय किसान, वेंकटेश्वरा को-ऑप पॉवर अँड अ‍ॅग्रो प्रोसेसिंग सह. संस्था, नाशिक, मका आधारित इथेनॉल निर्मिती प्रकल्प, इंदापूर, स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर आणि पोलिस किसान, पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक (ग्रामीण) अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजिलेल्या या उपक्रमात कार्यक्रमाचे उदघाटक स्वेरीचे युवा सचिव डॉ. सुरज रोंगे, प्रमुख अतिथी वेंकटेश्वरा को-ऑप पॉवर अँड अ‍ॅग्रो प्रोसेसिंग सह. संस्था, नाशिकचे चेअरमन डॉ. शिवाजीराव डोळे, कार्यशाळा प्रशिक्षक विज्ञान संत अंकुश पाटील,सेवानिवृत्त डी.वाय. एस.पी. व पोलिस किसान सह.संस्था,पंढरपूरचे संस्थापक नानासाहेब कदम, पोलिस किसान पंढरपूरचे चेअरमन राजेंद्र पाटील, श्रीपाद डांगे, स्वेरीचे माजी अध्यक्ष तथा जेष्ठ विश्वस्त धनंजय सालविठ्ठल आदी उपस्थित होते.

डॉ.सूरज रोंगे म्हणाले,हे तंत्रज्ञान विकसित भारत 2047 या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे. शेतकऱ्यांनी स्वनिर्मित खतं- औषधांचा वापर केल्यास उत्पादन वाढ आणि खर्चात बचत निश्चित होईल.

डॉ.डोळे यांनी इंदापूर येथे उभारल्या जाणाऱ्या मका-आधारित इथेनॉल प्रकल्पाविषयी सांगितले की,हा प्रकल्प ग्रामीण भागासाठी आर्थिक समृद्धीचे दार उघडणारा ठरेल. सुमारे ₹ ५२० कोटींचा मका खरेदी करार सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसोबत होणार आहे.

या कार्यशाळेत सुमारे २००० शेतकऱ्यांचा सहभाग होता,तर गुन्हेगारी मार्ग सोडून शेतीकडे वळलेल्या शेतकऱ्याला पोशिंदा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.या उपक्रमा मुळे शेतकऱ्यांच्या आत्मनिर्भरतेकडे मोठे पाऊल टाकले गेले असून महाराष्ट्रातील कृषी विकासाला एक नवी दिशा मिळाली आहे.

तंत्रज्ञान कार्यशाळेचे यशस्वी नियोजन विज्ञान संत अंकुश पाटील,डॉ.शिवाजीराव डोळे,स्वेरीचे सचिव डॉ.सुरज रोंगे, माजी अध्यक्ष व विश्वस्त धनंजय सालविठ्ठल, निवृत्त डीवायएसपी नानासाहेब कदम, राजेंद्र पाटील डांगे,श्रीपाद डांगे बिरूदेव पारेकर,प्रविण जाधव,गणेश रत्नपारखी आदींसह स्वेरीच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले.

ठळक मुद्दे

विज्ञान संत अंकुश पाटील यांचे आतापर्यंत 33 प्रशिक्षणांचे विक्रमी यश.
2000 शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग.
पोलिस किसान संस्थेकडून पोशिंदा पुरस्काराने सन्मानित शेतकरी.
₹1200 कोटींच्या मका-आधारित इथेनॉल प्रकल्पाचा शेअर्स शुभारंभ.

Leave a Reply

Back To Top