सोलापूर जिल्ह्यात जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती (MCMC) स्थापन

सोलापूर जिल्ह्यात निवडणूक जाहिरातींवर कंट्रोल रूम,MCMC समिती कार्यरत

सोलापूर जिल्ह्यात जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती (MCMC) स्थापन

सोलापूर,दि.१३ (जिमाका)-राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती (MCMC) स्थापन करण्यात आली आहे.ही समिती ११ नोव्हेंबर २०२५ रोजी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली गठीत झाली.

निवडणूक कालावधीत प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या सर्व राजकीय जाहिरातींची तपासणी,प्रमाणीकरण आणि संनियंत्रण करणे हे या समितीचे प्रमुख कार्य आहे. जिल्हा माहिती अधिकारी हे या समितीचे सदस्य सचिव व नोडल अधिकारी म्हणून कार्य करतील.

समितीमधील सदस्य —जिल्हा पोलीस अधीक्षक सोलापूर,निवासी उपजिल्हाधिकारी सोलापूर,
संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी
संबंधित नगरपरिषद/नगरपंचायतचे मुख्याधिकारी

MCMC समिती प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, सोशल मीडिया व डिजिटल प्लॅटफॉर्मवरील सर्व राजकीय जाहिरातींचे परीक्षण व प्रमाणीकरण करणार आहे.

जिल्हा प्रशासनाने सर्व राजकीय पक्ष, उमेदवार आणि माध्यम प्रतिनिधींना आवाहन केले आहे की, प्रचारासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व जाहिराती MCMC कडून प्रमाणित करूनच प्रसारित कराव्यात, जेणेकरून निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व कायदेशीर चौकटीत पार पडेल.

Leave a Reply

Back To Top