26/11 शहीदांना सलाम : पंढरपूर पोलिस विभागाकडून रक्तदान शिबिराचे आयोजन
मेजर कुणाल गोसावी स्मृतीदिनानिमित्त पंढरपूरात समाजसेवेचा अनोखा उपक्रम
पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज — देशासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यातील सर्व शहीदांच्या स्मरणार्थ पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या हल्ल्यात शहीद झालेले श.हेमंत करकरे,श.अशोक कामठे, श.विजय साळसकर,श.राहुल शिंदे,श. तुकाराम ओंबाळे तसेच पंढरपूरचे वीरपुत्र श.मेजर कुणाल गोसावी यांना अभिवादन म्हणून हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. देशासाठी बलिदान दिलेल्या प्रत्येक वीराला सलाम करण्याचा हा एक प्रेरणादायी आणि जनजागृती करणारा उपक्रम ठरत आहे.रक्तदान शिबिर दि.26 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 9 ते सायं. 5 या वेळेत रखुमाई सभागृह (पोलीस संकुल), पंढरपूर येथे होणार आहे.

हा उपक्रम उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पंढरपूर यांच्या अंतर्गत आयोजित करण्यात आला असून मार्गदर्शन प्रशांत डगळे (I.P.S.), सहाय्यक पोलीस अधीक्षक पंढरपूर यांचे आहे.या शिबिरासाठी पोलीस विभागातील अधिकारी — विश्वजित घोडके (पो.नि. पंढरपूर शहर), टि. वाय. मुजावर (पो.नि. पंढरपूर तालुका), रेखा घनवट (पो.नि. पंढरपूर ग्रामीण) तसेच सागर कुंजीर (स.पो.नि. करकंब) यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी पोलीस बांधव प्रयत्न करत आहेत.

देशभक्ती,नागरिक सजगता आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालणारा हा उपक्रम पंढरपूरातील नागरिकांमध्ये उत्साह निर्माण करीत आहे. रक्तदानाद्वारे एखाद्याचे प्राण वाचवण्याची संधी आणि शहीदांना अभिवादन करण्याचा मान यामुळे नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

