पंढरपूरमध्ये भाजपाची भव्य प्रचारफेरी; प्रभाग 9-10 झाले कमळमय

प्रभाग 9 व 10 मध्ये भाजपाची जोरदार बॅटिंग; कमळाच्या समर्थनाची लाट

पंढरपूरमध्ये भाजपाची भव्य प्रचारफेरी; प्रभाग 9-10 झाले कमळमय

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज : पंढरपूर नगरपालिका निवडणूक 2025 च्या प्रचाराचा जोर वाढत असताना, आज प्रभाग क्रमांक 9 आणि 10 मध्ये भाजपाच्या उमेदवारांची प्रभावी व भव्य प्रचारफेरी काढण्यात आली. या दोन्ही प्रभागांमध्ये भाजपाच्या उमेदवारांना मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता संपूर्ण परिसर भाजपामय झाल्याचे चित्र दिसून आले. प्रचारफेरी दरम्यान सर्वसामान्य नागरिक, युवक, महिला, ज्येष्ठ मतदार यांनी कमळ चिन्ह असलेल्या भाजप उमेदवारांचे जोरदार स्वागत केले.

या फेरीत विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट, दीपक भोसले, प्रभागातील उमेदवार वैभव भोसले तसेच पंढरपूर शहराच्या नगराध्यक्ष पदासाठी भाजपाच्या उमेदवार सौ.शामलताई लक्ष्मण शिरसाट यांची प्रमुख उपस्थिती होती. शहरातील सर्व प्रभागांमधील भाजपाचे उमेदवारही या फेरीत सहभागी झाले.

या ठिकाणी बोलताना माजी आमदार प्रशांत परिचारक म्हणाले की,प्रभाग 9 व 10 मधील मतदार बंधू-भगिनींनी कमळ चिन्हासमोरील बटण दाबून भाजपाला प्रचंड मताधिक्याने विजयी करा.त्यांनी या भागातील सर्व मूलभूत सुविधा,प्रलंबित विकासकामे,नागरिकांच्या अडचणी व समस्या यांचे तातडीने समाधान करण्याचे आश्वासन दिले.

प्रभाग 9 आणि 10मध्ये विविध जाती- धर्मांतील नागरिक राहत असून त्यांच्या तक्रारी आणि विकास अपेक्षा पूर्ण करण्याची ग्वाही प्रशांत परिचारक व सौ.शामलताई शिरसाट यांनी दिली.

नागरिकांनीही भाजपाच्या प्रचारफेरीत मोठ्या संख्येने सहभागी होत,आमचे मत कमळालाच असा स्पष्ट पवित्रा घेतला.

Leave a Reply

Back To Top