सन्मती सेवा दलाच्या कार्याचे केले कौतुक

सन्मती सेवा दलाच्या कार्याचे पोलिस उपायुक्त संजयकुमार पाटील यांच्याकडून कौतुक

श्री सम्मेद शिखरजी स्वच्छता अभियानास पाटील सरांचा पाठिंबा; पायी वंदनेचा व्यक्त केला मानस

अतिरिक्त पोलिस महासंचालक डॉ संजय लाठकर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन आणि मिळणारे सहकार्याबद्दल केली कृतज्ञता व्यक्त

संघटनेचे विविध उपक्रम,सामाजिक योगदान आणि सातत्यपूर्ण कार्य याची दखल घेत श्रीकांत बी.काळे यांनी केले कौतुक

मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि. 27 नोव्हेंबर 2025 – नवी मुंबई पोलिस उपायुक्त (मुख्यालय) संजयकुमार पाटील यांची खारघर येथे सदिच्छा भेट घेण्यात आली. या भेटीदरम्यान पाटील सरांनी गुरुबंधूच्या मायेने व स्नेहाने सर्वांसाठी भोजनाची विशेष व्यवस्था केली होती.

नवी मुंबई पोलिस उपायुक्त संजयकुमार पाटील यापूर्वी अकलूज ता.माळशिरस येथे DySP म्हणून कार्यरत होते.

या भेटीत सन्मती सेवा दलाच्या सुरु असलेल्या सामाजिक उपक्रमांची तसेच आगामी काळात होणाऱ्या महत्त्वाच्या कार्यक्रमांची माहिती डॉ संजय पाटील यांना देण्यात आली. समाजातील बदलत्या परिस्थितीचा लोकांवर होणारा परिणाम, युवकांची सहभागिता तसेच सामाजिक बांधिलकी या मुद्द्यांवरही चर्चा झाली.

डॉ संजय पाटील यांचा सन्मान करताना पदाधिकारी

यावेळी बोलताना पाटील सरांनी सन्मती सेवा दलाच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करत हे कार्य आणखी गतिमान व्हावे, याकरिता युवकांची समाजकार्यातील सक्रियता अत्यंत गरजेची असल्याचे मत व्यक्त केले.

सन्मती सेवा दलाच्या श्री सम्मेद शिखरजी स्वच्छता अभियान उपक्रमाची माहिती दिली असता नवी मुंबई पोलिस उपायुक्त संजय पाटील यांनी स्वतः श्री सम्मेद शिखरजी येथे येऊन पायी वंदना करण्याचा मानस व्यक्त केला.

या सदिच्छा भेटीदरम्यान श्री सन्मती सेवा दलाच्या वतीने पोलिस उपायुक्त संजय पाटील यांचा शाल,गुलाबपुष्प आणि दुपट्याने सन्मान करण्यात आला.

तसेच डॉ.संजय आनंदराव लाठकर (IPS), अतिरिक्त पोलिस महासंचालक (सुरक्षा), अणुऊर्जा विभाग – Addl. Director General (Security), Department of Atomic Energy) यांची मुंबईतील अनुशक्ती भवन कार्यालयात श्री सन्मती सेवा दलाच्या प्रतिनिधींनी सदिच्छा भेट घेतली.

डॉ संजय लाठकर यांचा सन्मान करताना पदाधिकारी

गेल्या १५ वर्षांपासून अखंडपणे राबविण्यात येत असलेल्या श्री सम्मेद शिखरजी स्वच्छता अभियानासाठी अतिरिक्त पोलिस महासंचालक डॉ संजय लाठकर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन आणि मिळणारे सहकार्य याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.यानिमित्त श्री सन्मती सेवा दलाच्यावतीने त्यांना कृतज्ञतापत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी 16 सप्टेंबर 2024 रोजी श्री सम्मेद शिखरजी, मधुबन (झारखंड) येथे फेडरेशन ऑफ हुमड जैन समाज आणि श्री सन्मती सेवा दलाच्या संयुक्त विद्यमाने प्रस्थापित झालेल्या विश्वविक्रमाची माहितीही देण्यात आली. हा विश्वविक्रम घडवून आणण्यासाठी डॉ.संजय लाठकर यांनी दिलेली प्रेरणा आणि मोलाचे मार्गदर्शन विशेष ठरल्याचे सांगण्यात आले.

गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डतर्फे डॉ. लाठकर यांना प्रदान करण्यात आलेले वैयक्तिक नावाचे सर्टिफिकेट आणि बॅज हे श्री सन्मती सेवा दलाच्या प्रतिनिधींनी त्यांना अधिकृतरित्या सुपूर्त केले.

प्रतिनिधींनी अतिरिक्त पोलिस महासंचालक डॉ.संजय लाठकर यांना लेखक अविनाश थोरात यांचे अजित डोवाल : गुप्तहेर ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे प्रेरणादायी जीवनचरित्र भेट दिले.

या संभाषणादरम्यान अतिरिक्त पोलिस महासंचालक डॉ.लाठकर यांनी सामाजिक कार्यातील सातत्याचे महत्त्व अधोरेखित केले. युवकांनी तंदुरुस्त राहण्यासाठी व्यायामाचे महत्त्व तसेच व्यक्तिमत्व विकासासाठी वाचनाचे महत्त्व सांगताना त्यांनी आपल्या वैयक्तिक ग्रंथसंग्रहात 500–600 पुस्तके असल्याचे विशेषत्वाने नमूद केले.त्यांच्या प्रत्येक विधानामध्ये सूक्ष्म निरीक्षणशक्तीची जाणीव स्पष्टपणे दिसून आली.

ग्रामीण भागातील युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी भविष्यात श्री सन्मती सेवा दलाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहावे, असे निमंत्रण डॉ.लाठकर यांना देण्यात आले.

तर केंद्रीय राज्यमंत्री आयुष आणि आरोग्यसेवा, भारत सरकार  यांचे पी.ए. श्रीकांत बी.काळे यांची मुलुंड येथील शासकीय निवासस्थानी श्री सन्मती सेवा दलाच्या पदाधिकार्यांनी सदिच्छा भेट घेतली.

श्रीकांत बी.काळे यांचा सन्मान करतांना पदाधिकारी

या भेटीदरम्यान श्री सन्मती सेवा दल आयोजित राज्यस्तरीय वधू-वर मेळावा कार्यक्रमाची निमंत्रणपत्रिका तसेच कुंथलगिरी येथे होणाऱ्या महामस्तकाभिषेक कार्यक्रमाची पत्रिका श्रीकांत बी. काळे यांना देण्यात आली.संस्थेच्या वतीने श्रीकांत बी.काळे यांचा शाल व दुपट्टा देऊन मान्यवर सत्कार करण्यात आला.

संभाषणादरम्यान सामाजिक क्षेत्रात काम करताना येणाऱ्या अडचणींवर श्रीकांत बी. काळे यांनी मार्गदर्शन करत वास्तव अडचणींवर प्रभावी उपाययोजना सुचविल्या. तसेच संघटनेचे विविध उपक्रम,सामाजिक योगदान आणि सातत्यपूर्ण कार्य याची दखल घेत कौतुकही केले.

या भेटीत संस्थेच्या आगामी प्रकल्पांची, युवकांना जोडण्याच्या उपक्रमांची आणि समाजहितासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहितीही श्रीकांत बी.काळे यांना देण्यात आली.

या तीनही भेटीप्रसंगी श्री सन्मती सेवा दल संस्थापक अध्यक्ष मिहीर गांधी, माजी अध्यक्ष विरकुमार दोशी, हर्षल दोशी, संदेश गांधी आणि पुष्कर दोशी आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Back To Top