पंढरपूरमध्ये विकास ठरत आहे निर्णायक मुद्दा
पंढरपूरच्या राजकारणात परिचारकांची दमदार पकड; नागरिकांचा वाढता विश्वास प्रतिस्पर्ध्यांसाठी धोक्याची घंटा
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज–पंढरीच्या पांडुरंगाच्या नगरीत सुरू असलेल्या नगरपरिषद निवडणुकीत सध्या राजकीय वातावरण तापवले आहे.नागरिकांच्या नजरेत प्रत्यक्ष दिसणाऱ्या विकासकृतींमुळे परिचारक कुटुंबा विषयीचा विश्वास मागील काही महिन्यांत प्रचंड वाढला असून, हा वाढलेला लोकसमर्थनाचा कल प्रतिस्पर्ध्यांच्या चिंतेचे कारण बनला आहे.

माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांनी रचलेला लोकाभिमुख कामांचा पाया अजूनही ठाम आहे.याच वारशावर आधुनिक दृष्टिकोन जोडत प्रशांत परिचारक यांनी शहरातील प्रगतीचा वेग वाढवला आहे.त्यामुळे पंढरपूरच्या राजकारणात काम केलंय म्हणून विश्वास मिळतोय ही नवी समीकरणे आकार घेत आहेत.

शहरातील रस्त्यांचे सुधारकाम,स्वच्छता मोहिमा,शैक्षणिक प्रकल्प, आरोग्य विषयक उपक्रम आणि युवकांसाठी उपयोगी कार्यक्रम या सर्व गोष्टी थेट नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या असल्याने परिचारक कुटुंबाची प्रतिमा अधिक बळकट होत आहे.याउलट काही प्रतिस्पर्धी नेत्यांकडून विकासाच्या घोषणा परंतु प्रत्यक्ष कामात कमीपणा असल्याची चर्चा सर्वत्र ऐकू येत आहे. त्यामुळे नागरिकांचा कल स्पष्टपणे प्रत्यक्ष काम करणाऱ्या नेतृत्वाकडे झुकताना दिसत आहे.

स्थानिक पातळीवर परिचारकांनी केलेले काम दिसते; बाकी लोक फक्त बोलतात अशी जनमानसातील भावना राजकीय समीकरणांवर सरळ परिणाम करीत आहे.तज्ज्ञांच्या मते, या काळात पंढरपूरमध्ये नेमके काय होणार हे ठरवताना विकासाची विश्वसनीयता हा सर्वात महत्त्वाचा घटक ठरणार आहे आणि यात परिचारक कुटुंबाचा प्रभाव अधिक ठळकपणे दिसत आहे.

