आमदार अभिजीत पाटील यांच्या निधीतून जाधववाडी येथे विकासकामाचे भूमिपूजन
दिलेला शब्द निभावला! जाधववाडीत सभामंडपाच्या कामाचा शुभारंभ, नागरिकांत उत्साह
आमदार अभिजीत पाटील यांच्या विकास निधीतून जाधववाडीत सभामंडपाच्या कामाचे भूमिपूजन

माढा/ ज्ञानप्रवाह न्यूज –जाधववाडी ता.माढा येथे आमदार अभिजीत पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून मारुती मंदिराच्या सभामंडपाच्या कामाचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात पार पडले. निवडणुकीदरम्यान नागरिकांनी केलेली मागणी पूर्ण करत आमदार पाटील यांनी निवडणुकीत दिलेला शब्द पाळण्यासाठी मी कटीबद्ध आहे,असा पुनरुच्चार केला.
सभामंडपाच्या भूमिपूजनावेळी नागरिकांमध्ये समाधानाचे आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. आपल्या भाषणात आमदार अभिजीत पाटील म्हणाले की, माढा मतदारसंघातील जनतेचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी आपण सातत्याने काम करत आहोत. विकासकामांमध्ये कोणताही पक्षपात न करता सर्वांना न्याय देत कामे केली जातील.

आमदार पाटील पुढे म्हणाले,माढ्यातील प्रत्येक विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही. राजकारणापलीकडे जाऊन विकासासाठी काम करू. तुम्ही फक्त साथ द्या, माढा तालुक्याचा सर्वांगीण विकास करू यात शंका नाही.
कार्यक्रमासाठी भारत आबा शिंदे, राजाभाऊ चवरे, आनंद कानडे, दीपक देशमुख, अंगद जाधव, शिवाजी भाकरे, विनंती कुलकर्णी, निलेश पाटील, सरपंच राहुल जाधव, विजय भाकरे, शिवाजी कन्हेरे आदी मान्यवर उपस्थित होते.

