पाणी व स्वच्छता कर्मचार्यांच्या प्रश्नावर शासन सकारात्मक – मंत्री गुलाबराव पाटील
मागण्या मान्य होईपर्यंत कृती समिती आंदोलनावर ठाम..
सोलापूर/ ज्ञानप्रवाह न्यूज- राज्यातील पाणी व स्वच्छता कर्मचारी राज्य कृती समितीच्या वतीने राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, राज्यमंत्री मेघना साकोरे यांना निवेदन देणेत आले.पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील कर्मचार्यांचे प्रश्न सोडविणेसाठी मुंबई येथे प्रधान सचिवांचे अध्यक्षतेखाली बैठक घेणेत येणार आहे. दरम्यान कर्मचार्यांचे मानधन व प्रश्न निकाली निघेपर्यंत काळ्या फिती लावून असहकार आंदोलनावर कृती समिती ठाम आहे.

आज कृती समितीचे अध्यक्ष रमाकांत गायकवाड,कार्याध्यक्ष सचिन जाधव, उपाध्यक्ष ऋषीकेश शिलवंत,उपाध्यक्ष बंडू हिवरे ,नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यातील पाणी व स्वच्छता विभागातील कर्मचारी यांनी आज हैद्राबाद हाऊस येथे प्रधान सचिव पराग जैन यांची भेट घेतली.
स्वच्छ भारत मिशन ग्रामीणसाठी राज्यस्तरावर निधी असूनही दोन महिने वेतन नाही. जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशनसाठी वेतनासाठी स्वतंत्र तरतुद करणेत यावी.मुख्यमंत्र्यांनी सुचना देऊनही संघटनेची बैठक राज्यस्तरावर घेण्यात आली नाही.आकृतीबंध तयार करणे बाबत मुख्य सचिवांनी लेखी सुचना देऊनही त्याची अंमलबजावणी नाही. न्यायालयाचे निर्णयावर कर्मचार्यांना सेवेत कायम करणेची कार्यवाही करण्यात आलेली नाही या प्रमुख मागण्यांसाठी चर्चा करण्यात आल्या.
त्यानंतर राज्य कृती समितीचे पदाधिकारी यांची बैठक रवी भवन येथे घेणेत आली. या बैठकीत कृती समिती आंदोलनावर ठाम आहे जोपर्यंत वेतन खातेवर जमा होत नाही तोपर्यंत काळ्या फिती लावून असहकार आंदोलन सुरू ठेवणेवर कर्मचार्यांनी एकमुखी शिक्कामोर्तब केले.

नागपूर चे निखील रौंदळकर,गडचिरोलीचे अमित माणुसमुरे,प्रशांत सातव अमरावती, सचिन खाडे, विनोद खोब्रागडे वर्धा, संपदा बोधनकर वर्धा, नागपूर चे विक्रांत इंगळे, दिनेश मासुदकर, प्रविण खंदारे, प्रशांत उमक, आशिष रावळे, अजय गजापूरे भंडारा, राजेशकुमार चौधरी,चैताली देशमुख,अंजली पाटणकर,हर्षा संभारे,श्वेता पाबळे यांचेसह महिला प्रतिनिधी उपस्थित होते.
पाणी व स्वच्छता कर्मचारी यांचे प्रश्नावर शासन सकारात्मक – मंत्री गुलाबराव पाटील
राज्यातील पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील कर्मचारी यांचे प्रश्न सोडविणे साठी शासन सकारात्मक आहे. जलजीवन मिशन साठी निधी नाही. स्वच्छ भारत मिशन साठी उपलब्ध असलेले निधीतून वेकन अदा करणे, आकृतीबंध व कायम करणेचे प्रश्नाबाबत शासन सकारात्मक असल्याचे राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले.
मुंबई किंवा नागपुर येथे कृती समितीची बैठक घेऊन अडचणी सोडविणार- प्रधान सचिव पराग जैन
मुख्यमंत्री यांनी निवेदनावरील दिलेले सुचनेनुसार कृती समितीची बैठक मुंबईत घेणेत येणार आहे. या विषयाशी संबंधित सर्व अधिकारी यांचेशी चर्चा करून मार्ग काढणेत येईल.न्यायालयीने दिलेले निकाल,मुख्य सचिवांनी दिलेले सुचना व वेतनातील अडथळे दूर करण्यासाठी नागपूर किंवा मुंबईत तातडीची बैठक घेण्याची सुचना सहसचिव यांना दिल्या.
पाणी व स्वच्छता कर्मचारी यांचे प्रश्नाबाबत राज्यातील १५ आमदारांचे तारांकित प्रश्न ..
राज्यातील विविध १५ आमदारांनी जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत काम करणारे कर्मचारी यांचे वेतनात होत असलेली दिरंगाई व विविध अडचणी बाबत तारांकित प्रश्न विधानसभा व विधानपरिषदेत सादर केले आहेत.सर्वप्रथम रायगड चे आमदार व अमरावतीचे आमदार देवराव भोंगळे व आमदार संदीप जोशी यांनी या प्रश्नास वाचा फोडली आहे.त्यानंतर १३ आमदारांनी तारांकित प्रश्न उपस्थित केले आहेत.

