करंजे गावात अज्ञात व्यक्तींनी शेतकऱ्याचा पेंढा जाळला; वारंवार नुकसानीमुळे शेतकरी त्रस्त
करंजे येथील शेतकरी सुदाम व ज्ञानेश्वर कुडले यांच्या शेतात जाळपोळ; पिके, पेंढा व गोबरगॅसचे मोठे नुकसान
करंजे /ज्ञानप्रवाह न्यूज : Karanje Farmer Incident करंजे गावातील काळवट रान परिसरात अज्ञात व्यक्तीने शेतकऱ्यांच्या शेतात जाळपोळ Karanje Kalwat Ran FireFarmer Crop Damage केल्याची गंभीर घटना घडली आहे.शेतकरी सुदाम कुडले आणि ज्ञानेश्वर कुडले यांच्या शेतात बांधून ठेवलेला सुमारे ९०० पेंढा जाळण्यात आल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.आगीची माहिती मिळताच ग्रामस्थांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र तो अयशस्वी ठरला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

विशेष म्हणजे यापूर्वीही शेतकरी सुदाम कुडले यांच्या शेतात अज्ञात व्यक्तीने १४०० पेंढा जाळण्याची घटना घडवून आणली होती. तसेच पिकावर आलेली सुमारे १८०० मिरचीची झाडे आणि १५०० झेंडूची रोपे उपटून टाकण्यात आली होती. याशिवाय गोबरगॅस प्रकल्प व शेतीतील पाण्याच्या टाकीचे (टी) देखील नुकसान करण्यात आले आहे.
या सर्व नुकसानीबाबत यापूर्वीच भोर पोलीस स्टेशन येथे ऑनलाईन तक्रार दाखल करण्यात आली असून, तक्रारीत संशयित व्यक्तींची नावे देखील नमूद करण्यात आली आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अधीक्षक अण्णासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार पिसाळ करत आहेत.
वारंवार होत असलेल्या जाळपोळीच्या व नुकसानाच्या घटनांमुळे शेतकरी वर्ग भयभीत झाला असून, दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींचा शोध घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.




