मंगळवेढ्यात RTO ई-चलान APKच्या नावाखाली 8.49 लाखांची सायबर फसवणूक अज्ञात हॅकरविरोधात गुन्हा दाखल
खर्डी येथील नागरिकाला बनावट RTO लिंकचा फटका; YONO SBI अॅप हॅक करून 8.49 लाख लंपास
मंगळवेढा येथे बनावट RTO ई-चलान APK लिंक उघडल्याने YONO SBI अॅप हॅक होऊन 8.49 लाखांची ऑनलाइन फसवणूक झाली. अज्ञात आरोपी विरोधात सायबर क्राईम गुन्हा दाखल.
मंगळवेढा | ज्ञानप्रवाह न्यूज : Mangalwedha Cyber Crime मंगळवेढा तालुक्यात RTO ई-चलान APK RTO E Challan च्या नावाखाली मोठी सायबर RTO E Challan Scam फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खर्डी ता.पंढरपूर येथील नागरिकाच्या YONO SBI मोबाईल अॅपवर हॅकिंग करून तब्बल 8 लाख 49 हजार 993 रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करण्यात आले आहेत. या प्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 1067/2025 अन्वये अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी नागेश भगवान निंबाळकर रा. खर्डी,ता.पंढरपूर यांनी दिलेल्या माहिती नुसार दि.22 डिसेंबर 2025 रोजी त्यांच्या मोबाईलवर ओळखीच्या व्यक्तीच्या नावाने RTO E-Challan APK (15 MB) अशी PDF/फाईल WhatsApp वर प्राप्त झाली. ही अधिकृत RTO चलान असल्याचे समजून त्यांनी ती ओपन केली. त्यानंतर next-next करत असताना फोनमध्ये संशयास्पद प्रक्रिया सुरू झाली.
दि. 23 डिसेंबर 2025 रोजी सकाळी, त्यांच्या मोबाईलवर YONO SBI अॅप रजिस्ट्रेशन,Beneficiary Addition आणि Fund Transfer OTP संदर्भातील मेसेज येऊ लागले.काही वेळातच त्यांच्या खात्यातून IMPS द्वारे वेगवेगळ्या टप्प्यांत मोठ्या रकमा ट्रान्सफर झाल्या. यामध्ये
₹3,99,997,₹2,50,000,₹1,50,000,₹49,996 अशी एकूण ₹8,49,993/- रक्कम अज्ञात बँक खात्यांमध्ये व क्रेडिट कार्ड बिल पेमेंटद्वारे वळविण्यात आली.
फसवणूक लक्षात येताच फिर्यादीने तत्काळ 1930 सायबर हेल्पलाईन वर तक्रार नोंदवली तसेच NCCRP पोर्टलवर अर्ज केला. स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेशी संपर्क साधून खाते होल्ड करण्याची मागणी करण्यात आली. मात्र त्याआधीच हॅकरने मोबाईल नंबरवर ऑटो-मेसेजिंग, YONO अॅप हॅक करून OTP द्वारे पासवर्ड बदलत संपूर्ण नियंत्रण मिळवले होते.
या प्रकरणी BNS कलम 318(4), 319(2) तसेच IT Act 66(C), 66(D) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून मंगळवेढा पोलीस निरीक्षक बोरिगिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.




