लक्ष्मी टाकळी उपसरपंच पदी शिंदे शिवसेना – भाजपा गटाचे (परिचारक गट) उमेदवार सागर सोनवणे विजयी

१७ सदस्य असणार्या या ग्रामपंचायतीत शिंदे शिवसेना व परिचारक गटाचे एकूण ११ तर विरोधी गटाचे ६ उमेदवार

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर शहरा लगतची मोठी ग्रामपंचायत असलेल्या लक्ष्मी टाकळी च्या उपसरपंचपदी शिंदे शिवसेना – भाजपा गटाचे (परिचारक गटाचे) उमेदवार सागर सोनवणे हे चुरशीने झालेल्या लढतीत १० विरूद्ध ७ मते पडून विजयी झाले.

एकूण १७ सदस्य असणारी ही ग्रामपंचायत शिंदे शिवसेना व परिचारक गटाचे एकूण ११ तर विरोधी गटाचे ६ उमेदवार असून विरोधी गटाचे उमेदवार यांना ७ मते पडली तर परिचारक गटाचे उमेदवार सागर सोनावणे यांना १० मते पडली.

सलग २५ वर्ष परिचारक गटाचे अत्यंत निष्ठेने काम करणारे सोनवणे कुटुंबीयांकडे सलग २० वर्ष ग्रामपंचायत सदस्यपद आहे अनिल सोनवणे यांनी सलग २ वेळा निवडून येऊन २०१० साली उपसरपंचपदाचा पहिला बहुमान मिळवला होता.२०१० साली काका उपसरपंच तर २०२४ साली पुतण्या उपसरपंच झाला आहे.२४ तास समाजकारणाचा वारसा जपत अनेक जेष्ठ महिलांना श्रावण बाळ योजनेंतर्गत १५०० रुपये महिना लाभ मिळवून दिला.संजय गांधी निराधार योजने अंतर्गत अनेक महिलांना १५०० रु. लाभ मिळवून दिला. २०१९ साली उज्वला गॅस योजनेअंतर्गत ९० कुटुंबांना गॅस कनेक्शन मोफत घरपोच दिले. अनेक कुटुंबांना रेशन कार्ड काढून दिले, लाडकी बहीण योजने चा टाकळी परिसरात कॅम्प घेऊन २७४ महिलांना त्याचा लाभ मिळवून दिला. या पुढे गावातील योजना ह्या घरादारापर्यंत पोहचुन प्रत्येक कुटुंबाला कसा फायदा होईल लाभ होईल यासाठी उपसरपंच पदाच्या माध्यमातून काम करणार आहे.

शिंदे गटाचे साठे यांचे ४ सदस्य व परिचारक गटाचे ७ सदस्य अशी युती असून सरपंच संजय साठे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रकिया पार पडली. जि.प सदस्य रामदास ढोणे, शिवसेना जिल्हा प्रमुख तथा सदस्य जिल्हा नियोजन समिती सोलापूर महेश साठे,विष्णुपंत ताड, चेअरमन महादेव काशीद, नानासो मोरे,विठ्ठल ढोणे,दाजी चंदनशिवे,आबासाहेब पवार, बिनू खपाले,सुरेश टिकोरे,अनिल सोनवणे,औदुंबर पोतदार, सरपंच संजय साठे,मा.सरपंच नंदकुमार वाघमारे,ग्रा.पं सदस्य औदुंबर ढोणे, महादेव पवार, सचिन वाळके, बापू उकरंडे, बापू देवकते, सागर कारंडे, गणेश ढोणे,गणेश चंदनशिवे,दादा धोत्रे, अंकुश ढोणे,ग्रा.पं सदस्या सौ.नागरबाई साठे, सौ आशाबाई देवकते, सौ रेश्मा साठे,सौ. विजयमाला वाळके सौ.रोहिणी साठे. सौ. रुपाली कारंडे , ग्रामविकास अधिकारी जयंत खंडागळे व कर्मचारी वर्ग यांचेसह शिंदे- भाजप गटाच्या सदस्यांचे सहकार्य लाभले.


Discover more from Dnyan pravah news

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from Dnyan pravah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading