कुरेश कॉन्फरन्सच्या सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्हाध्यक्षपदी अनुक्रमे गौस खाटीक, याकुब चौधरी, मोहंमद कलाल यांची नियुक्ती
सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी इस्लामपूरचे तौफीक खाटीक , सातारा शहराध्यक्षपदी मोहसीन कलाल तर वाळवा तालुकाध्यक्षपदी मलीक खाटीक यांची ॲड सनोबर अली कुरेशी यांनी केली नियुक्ती
सांगली /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१/०८/२०२४- देशातल्या मुस्लीम खाटीक समाजाच्या कुरेश कॉन्फरन्स नवी दिल्ली या राष्ट्रीय संस्थेच्या सांगली,कोल्हापूर आणि सातारा जिल्हाध्यक्ष पदी अनुक्रमे महंमद गौस मुसा खाटीक मिरज,याकुब महिबूब चौधरी कोल्हापूर , मोहंमद युनुस कलाल सातारा यांची तर सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी इस्लामपूरचे तौफीक रज्जाक खाटीक यांची तसेच सातारा शहराध्यक्षपदी मोहसीन अख्तरनवाज कलाल आणि वाळवा तालुका अध्यक्षपदी इस्लामपूरचे मलीक चांदसाहब खाटीक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
लहान जनावरांचे आणि मोठ्या जनावरांचे खाटीक यांची संयुक्तपणे बनलेली कुरेश कॉन्फरन्स ही देशव्यापी संस्था – संघटन आहे.या कुरेश कॉन्फरन्सचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.सनोबर अली कुरेशी यांनी तिन्ही जिल्ह्यातील नुतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीचे पत्र पाठविले आहे.
कुरेश कॉन्फरन्सचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आटपाडीचे सादिक खाटीक यांनी गौस खाटीक, याकुब चौधरी, मोहंमद कलाल, तौफीक खाटीक, मोहसीन कलाल आणि मलीक खाटीक या सहाही नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या नावाची शिफारस केली होती.
नुतन सर्व पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीबद्दल कुरेश कॉन्फरन्सचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सुप्रीम कोर्टातील वकील ॲड.सनोबर अली कुरेशी, राष्ट्रीय उपाध्यक्ष सादिक खाटीक, राष्ट्रीय उपाध्यक्ष असिफ कुरेशी, राष्ट्रीय सरचिटणीस मोहंमद कुरेशी तथा हाजी मुख्तार,राष्ट्रीय सल्लागार इसाक खडके, महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा प्रा.कु.मोईन कुरेशी पुणे, राज्याचे कार्याध्यक्ष ॲड मेहबूब कोतींबरे सोलापूर, राज्याचे सरचिटणीस हाजी अब्दुलरहिमान कुरेशी अकोला यांनी त्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे खास अभिनंदन केले आहे .

