सरकारचा रिमोट कंट्रोल दुसऱ्यांच्या ताब्‍यात गेल्‍याने मुख्‍यमंत्री हतबल, भाजप नेत्याची टीका


अहमदनगरः ‘प्राप्तिकर विभागाने १ हजार ५० कोटी रुपयांच्‍या समोर आणलेल्‍या घोटाळ्यात राज्यातील कोणाला लक्ष्‍मी प्रसन्‍न झाली आणि कोणाचे हात सोन्‍याने पिवळे झाले, हे लवकरच समोर येईल. या घोटाळ्यात आधिकारी, दलाल आणि काही मंत्र्यांची नावे असल्‍याची आपली माहिती आहे, असा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. ‘राज्य सरकारचा रिमोट कंन्‍ट्रोलही आता दुस-यांच्‍या ताब्‍यात गेल्‍याने मुख्‍यमंत्री हतबल झाले आहेत,’ अशी टीकाही त्‍यांनी केली.

प्रवरानगर येथे प्रसारमाध्यमांशी विखे पाटील बोलत होते. ते म्हणाले, ‘महाविकास आघाडी सरकार भ्रष्‍टाचाराच्‍या विळख्‍यात अडकत चालले आहे. या घोटाळ्यांवरुन जनतेचे लक्ष विचलित करुन, केवळ दिशाभूल करण्‍याचे काम मंत्र्याकडून सुरु आहे. सोमवारचा महाराष्ट बंद त्‍याचसाठी होता. त्यामुळेच त्याला प्रतिसाद मिळाला नाही. मागील आठवड्यात प्राप्तिकर विभागाने समोर आणलेल्‍या घोटाळ्यात आधिकारी, दलाल आणि काही मंत्र्यांची नावे असल्‍याची आपली माहीती आहे. या घोटाळ्यात कोणाला लक्ष्‍मी प्रसन्‍न झाली आणि कोणाचे हात सोन्‍याने पिवळे झाले, हे लवकरच समोर येईल. हे रॅकेट उघड झाल्‍यास अहमदनगर जिल्‍ह्यातील काहींची नावे पुढे आली तर आश्‍चर्य वाटायला नको. महाविकास आघाडी सरकारच्‍या कार्यकाळात भ्रष्‍टाचाराची मालिकाच समोर आली आहे. राज्‍याच्‍या इतिहासात गृहमंत्री फरार झाल्‍याची घटना प्रथमच घडली आहे,’ असेही विखे पाटील म्हणाले.

मला आजही वाटते मी मुख्यमंत्री आहे; फडणवीसांनी सांगितली ‘मन की बात’

लखीमपूर घटना आणि त्यासाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद संबंधी ते म्हणाले, ‘लखीमपूरमधील घटनेचे समर्थन नाहीच. या घटनेतील वास्‍तविकता चौकशीतून समोर येईलच. या घटनेचे भांडवल करुन, महाराष्‍ट्र बंद करण्‍याचा महाविकास आघाडीचा खटाटोप हा नाकर्तेपणा दाखविणारा ठरला आहे. केंद्र सरकारने आणलेले कृषी कायदे संसदेत मंजूर होत असताना महाविकास आघाडीचे मार्गदर्शक त्‍यावेळी सभागृहात काही बोलले नाहीत. शिवसेनेच्‍या खासदारांनी सोईनुसार गप्‍प बसण्‍याची भूमिका घेतली. आता फक्‍त राजकारणासाठी आपली पोळी भाजून घेण्‍याचे महाविकास आघाडी सरकारचे प्रयत्‍न जनतेच्‍याही लक्षात आले आहेत. त्‍यामुळेच मुख्‍यमंत्री हतबल झाल्‍याचे चित्र पाहायला मिळत आहे,’ असेही विखे पाटील म्हणाले.

समीर वानखेडे यांच्यावर पोलिसांचा वॉच?; गृहमंत्री म्हणतात…Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: