रस्ता मंजूर असूनही पंढरपूर नगरपरिषद तो रस्ता करत नसल्याने नागरिकांमधून नाराजी

रस्ता मंजूर असूनही पंढरपूर नगरपरिषद तो रस्ता करत नसल्याने नागरिकांमधून नाराजी Despite approval of the road,Pandharpur Municipal Council is not constructing the road

पंढरपूर /प्रतिनिधी ,06/09/2021 - पंढरपूर नगरपरिषद अंतर्गत येत असलेल्या इसबावी उपनगर भागातील प्रभाग क्र.12 मधील पुणे रोड ते विश्वशांती नगरकडे जाणारा रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून पुर्णतः मंजूर असूनही पंढरपूर नगर परिषद तो रस्ता करत नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

  त्या रस्त्याची अत्यंत दैनिय अवस्था झाली असून रस्त्याची पुर्णतः चाळण झाली असल्याने नागरिकांना त्या रस्त्यावरून ये-जा करण्यासाठी नाहक त्रासास सामोरे जावे लागत आहे. तर नागरिकांमधून तो रस्ता करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. आता तो रस्ता मंजूर असूनही का केला जात नाही याच कारण जरी अस्पष्ट असले तरी त्या रस्त्याचे काम गेल्या महिन्यापासून केवळ उद्घाटनाअभावी रखडले गेले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मात्र त्यामुळे नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात ञास सहन करावा लागत आहे.निदान आतातरी पंढरपूर नगरपरिषदेने या रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

पावसाळ्यात रस्त्यांची कामे करता येत नसल्याने ही कामे बंद असली तरी नागरिकांना होणार्‍या हालअपेष्टा कमी होणे अत्यंत गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: