पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते वाडीकुरोली येथे विविध विकास कामांचा शुभारंभ

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते वाडीकुरोली येथे विविध विकास कामांचा शुभारंभ Inauguration of various development works at Wadikuroli by Guardian Minister Dattatraya Bharane
     शेळवे /संभाजी वाघुले, १७/०९/२०२१ - वाडीकुरोली ता .पंढरपूर येथे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला.  याप्रसंगी माढा मतदारसंघाचे आ.बबनदादा शिंदे,सांगोला मतदारसंघाचे आ.शहाजीबापू  पाटील, सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे ,राष्ट्रवादी उद्योग-व्यापार विभाग प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे, पंढरपूर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयसिंह देशमुख, अशोक घोगरे, युवा गर्जनेचे संस्थापक समाधान काळे ,सरपंच अर्चना काळे, उपसरपंच अर्चना पाटील व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.  

  वाडीकुरोली ग्रामपंचायतीत कल्याणराव काळे यांचे मार्गदर्शनाखाली महिलांचे नेतृत्व सत्तेत आहे. काळे यांच्या मार्गदर्शनाखाली चार कोटीहून अधिक रकमेच्या विकास कामांचा शुभारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते आज करण्यात आला.या मध्ये पिराची कुरोली भंडीशेगाव रस्ता, शेळवे वाडीकूरोली रस्ता सुधारणा, वाडीकूरोली ते राज्य मार्ग 15 ला जोडणारा रस्ता, स्मशानभूमी सुशोभिकरण, दलित वस्ती सुधारणा या विकास कामांचा समावेश आहे .

   यावेळी बोलताना पालकमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की ,वाडीकुरोली गावच्या सर्वांगीण विकासासाठी कल्याणराव काळे आणि ग्रामपंचायतीवर कारभार करत असलेल्या सर्व महिला कारभारी सातत्याने पाठपुरावा करतात त्यामुळेच अनेक विकास कामे या गावांमध्ये होत आहेत . बुधवारी  झालेल्या मंत्रीमंडळ मिटिंगमध्ये सर्व विषय थांबवत अजित पवार यांनी कल्याणराव काळे यांच्या विषयाकडे लक्ष द्यावे देऊन त्यावर सविस्तर चर्चा करावी अशी आग्रही भूमिका घेतली. साखर कारखान्या संदर्भातील अडचणी लवकरच दूर होतील त्यासंदर्भातील विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत विषय मांडल्यानंतर त्यास महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व सर्व मंत्रिमंडळाने अनुमोदन दिले आहे . वाडीकुरोली गावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही पालकमंत्री भरणे  यांनी दिली .

   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक समाधान काळे यांनी केले. आभार ग्रामपंचायत सदस्य सुप्रिया काळे यांनी मानले.

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: