दोन वर्षापासून रखडले पुरग्रस्तांचे अनुदान

दोन वर्षापासून रखडले पुरग्रस्तांचे अनुदान
 पंढरपूर / नागेश आदापूरे - 2019 साली भीमा नदीला आलेल्या महापुरात शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीमुळे पंढरपूर तालुक्यातील शेती पिकांचे पंचनामा होऊनही बाधित शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत नुकसान भरपाई मिळाली नसून गेली दोन वर्ष झाली तरी अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही त्यामध्ये पंढरपूर तालुक्यातील 700 ते 800 शेतकरी वंचित राहिले आहेत. यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडलेला आहे तरी त्वरित नुकसान भरपाई मिळावी अशी बळीराजा शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली जवळेकर यांनी अपेक्षा व्यक्त केली.

 महापुरामुळे बाधित झालेल्या सोलापूर जिल्ह्या तील इतर तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली आहे मात्र पंढरपूर तालुक्यातील 700 ते 800 शेतकर्‍यांना अद्याप एक दमडीही मिळाली नसून त्वरित शासनाच्या वतीने नुकसान भरपाई द्यावी अन्यथा बळीराजा शेतकरी संघटनेच्यावतीने आपल्या कार्यालया समोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल अशा आशयाचे पत्र तहसीलदार व प्रांताधिकरी यांना देण्यात आले.

  यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जवळेकर, जिल्हासंघटक शेखर कोरके,सर्जेराव शेळके,रामेश्वर झांबरे,नितीन गावडे, औदुंबर सुतार,विष्णू भोसले,अंबादास भोई, अनंता लामकाने, अनिल शिंदे, रणजित शिंदे,सुरज भांगे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: