सोलापूर महानगरपालिकेत बसपा चाच महापौर होणार

सोलापूर महानगरपालिकेत बसपा चाच महापौर होणार mayor of Solapur Municipal Corporation will be the BSP
सोलापूर - सोलापूर महानगर पालिकेत आगामी महापौर हा बहुजन समाज पार्टीचाच आरूढ होईल.फुले-शाहु-आंबेडकरांच्या विचारधारेच्या महाराष्ट्राला जातीचे नाही, तर नीती चे राज्य बनवण्याचे काम केवळ बसपाच करू शकते. सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत यामुळे यंदा बसपाचे ४० नगरसेवक निवडून येतील.

सोलापूर महानगर पालिकेत बसपाचे यापूर्वी ४ नगरसेवक निवडून आले होते.पंरतु,यावेळी उत्तम संघटन कौशल्य असलेले कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या जोरावर महापालिकेत बसपा स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. वॉर्डनिहाय संघटनात्मक रचना कार्यान्वित करण्याचे निर्देश या अनुषंगाने दिले आहेत.महाविकास आघाडी सर्वच पातळीवर फोल ठरली आहे.जनतेचा राज्य सरकार विरोधात असलेला रोष संवाद यात्रेतून दिसून येत आहे.

   अशात सर्वजनांसाठी बसपा एकमेव पर्याय आहे.बहन मायावतींच्या नेतृत्वात बसपाच्या झेंड्याखाली एकत्रित आले, तर सर्व प्रश्न सुटतील.आता पक्षाची ताकद सत्ताधार्यांना दाखवण्याची वेळ आली आहे. आगामी निवडणुकांमधून ती ताकद सत्ताधार्यांना दिसेलच.ओबीसी, एससी, एसटीच्या आरक्षणाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ आली तरी बसपा मागे हटणार नाही.

सोलापुर महानगर पालिकेअंतर्गत सर्वसामान्यांच्या आरोग्य, पिण्याच्या पाण्याचा अथवा शोषित, पीडित, उपेक्षितांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न असो, बसपा सत्तेत आली तर सर्वसमावेशक विकास करण्यासाठी कटिबद्ध राहील.

  कार्यक्रमात प्रदेश प्रभारी प्रमोद रैना यांच्यासह प्रदेश महासचिव सुदीप गायकवाड, प्रदेश सचिव अप्पासाहेब लोकरे,जिल्हा प्रभारी अशोक आगवणे, बलभीम कांबळे, जिल्हाध्यक्ष मिलिंद बनसोड, हुलगेश चलवादी, शहराध्यक्ष देवा उघडे, जिल्हा उपाध्यक्ष अँड.प्रेमनाथ सोनावणे, कोषाध्यक्ष विलास शेरखाने, सचिव योगेश गायकवाड, शहर सचिव मिझा शेख, प्रविण कांबळे तसेच जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

जिसकी जितनी संख्या भारी,उसकी उतनी भागेदारी – रैना

कांशीराम साहेब यांनी ‘जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी भागेदारी’ची घोषणा दिली होती.जातीनिहाय लोकसंख्येच्या आधारे प्रतिनिधित्व देण्याची बसपाची मागणी अगोदर पासूनच आहे. बहन मायावती यांच्या नेतृत्वात याच दिशेने पार्टी कार्यरत आहे, असे प्रदेश प्रभारी प्रमोद रैना म्हणाले. आगामी निवडणुकांमध्ये तरूण, महिलांना योग्य प्रतिनिधित्व दिले जाईल. उत्तर प्रदेशात पाचव्यांदा बहन मायावती जींच्या नेतृत्वात बसपाची सत्ता येणार असल्याचा दावा रैना यांनी केला.

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: