महानगरपालिका निवडणूक : डॉ. नीलम गोऱ्हेंचे मतदारांना आवाहन – बाळासाहेब ठाकरे व एकनाथ शिंदेंच्या विचारांसाठी धनुष्यबाणाला मतदान करा

महानगरपालिका निवडणूक : डॉ. नीलम गोऱ्हेंचे मतदारांना आवाहन – बाळासाहेब ठाकरे व एकनाथ शिंदेंच्या विचारांसाठी धनुष्यबाणाला मतदान करा

महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मतदारांना निर्भय मतदानाचे आवाहन केले. बाळासाहेब ठाकरे व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विचारांना स्मरून धनुष्यबाण चिन्हाला मतदान करण्याचे त्यांनी सांगितले.

Pune mahanagarpalika election पुणे | ज्ञानप्रवाह न्यूज दि.14 जानेवारी 2026:महाराष्ट्रातील 29 महानगर पालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उद्या दि.15 जानेवारी मतदान होत असून, या पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे nilam gorhe यांनी मतदारांना निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन केले आहे. शिवसेना पक्षाच्या अधिकृत धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना भरघोस यश मिळवून देण्याचे त्यांनी आवाहन केले.

डॉ.नीलम‌ गोऱ्हे म्हणाल्या,हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे dcm Eknath Shinde यांच्या विचारांना व कार्याला स्मरून मतदारांनी धनुष्यबाणाला मतदान करावे. बाळासाहेबांच्या आदर्शातून मराठी आणि राष्ट्रीय अस्मितेचा भगवा ध्वज संपूर्ण महाराष्ट्रात अधिक बुलंद करण्याची ही संधी आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सुरू असलेल्या विकासकामांचा उल्लेख करत त्या म्हणाल्या की,शिंदे साहेबांच्या कार्याची पावती जनतेने दिली आहे. त्यांच्या विकासकामांवर विश्वास ठेवून मतदार निश्चितच शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हालाच मतदान करतील.

मतदान प्रक्रियेबाबत बोलताना डॉ. गोऱ्हे यांनी मतदारांना वेळेवर मतदानासाठी बाहेर पडण्याचे आवाहन केले. शासनाने मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर केली असून वाहतूक व अन्य सुविधा उपलब्ध आहेत.वातावरण अनुकूल आहे. कोणताही दबाव किंवा अडचण आल्यास शिवसेना तुमच्या पाठीशी उभी आहे,असे त्या म्हणाल्या.

संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर शुभेच्छा देताना त्यांनी सांगितले, तिळगूळ घ्या आणि गोड बोला,मात्र मतदान निर्भयपणे करा. लोकशाहीची पहिली पायरी म्हणजे निर्भय मतदान. पैशांच्या जोरावर निवडणूक जिंकता येत नाही हे भारतीय लोकशाहीने वेळोवेळी सिद्ध केले आहे.स्त्री शक्तीवर विशेष भर देत डॉ. गोऱ्हे म्हणाल्या,या निवडणुकीत लाडक्या बहिणी सूत्रधाराची भूमिका बजावतील. स्त्री शक्तीचा विजय निश्चित आहे.

महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांसाठी उद्या सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार आहे. सर्व मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन करत डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Back To Top