माजी सैनिक,वीर नारी व पाल्यांसाठी मेस्को सिक्युरिटीमध्ये सुरक्षा रक्षक भरती:मुंबईत प्रक्रिया सुरू

माजी सैनिक,वीर नारी व पाल्यांसाठी मेस्को सिक्युरिटीमध्ये mesco security सुरक्षा रक्षक भरती:मुंबईत प्रक्रिया सुरू

मेस्को सिक्युरिटीकडून माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांसाठी रोजगाराची संधी: कंत्राटी सुरक्षा रक्षक भरती

माजी सैनिक, वीर नारी, सेवानिवृत्त व सेवेतील जवानांच्या पत्नी व पाल्यांसाठी मेस्को सिक्युरिटीकडून सुरक्षा रक्षक पदासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.८ तास काम,पीएफ- ईएसआय,विमा व बोनस सुविधांसह ही भरती कंत्राटी पद्धतीने होणार असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी दिली

मुंबई | ज्ञानप्रवाह न्यूज,दि. २१ जानेवारी २०२६ –माजी सैनिक, वीर नारी तसेच सेवानिवृत्त व सेवेतील जवानांच्या पत्नी आणि अवलंबित पाल्यांसाठी मेस्को सिक्युरिटीकडून सुरक्षा रक्षक पदासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही भरती कंत्राटी सेवा पद्धतीने करण्यात येणार असून उमेदवारांना त्यांच्या राहत्या घरापासून १० ते १५ किलोमीटर अंतरावर कामाचे ठिकाण देण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई शहरचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रका द्वारे दिली आहे.

या भरती अंतर्गत सुरक्षा रक्षक पदासाठी दररोज ८ तास काम,आठवड्यातून १ साप्ताहिक सुट्टी तसेच पीएफ व ईएसआय अंतर्गत जीवन विमा,बोनस व ग्रॅच्युइटी यांसारख्या सुविधा देण्यात येणार आहेत.

वयोमर्यादेबाबत माहिती देताना सांगण्यात आले की,एक्स-सर्व्हिसमन (आर्मी, नेव्ही, एअर फोर्स) : ३५ ते ५८ वर्षे
सीआरपीएफ, एसआरपीएफ, बीएसएफ, सीआयएसएफ, आयटीबीपी, होमगार्ड : ३५ ते ५५ वर्षे
माजी सैनिकांच्या (ESM) वीर नारी : १८ ते ४५ वर्षे
माजी सैनिकांच्या (ESM) पत्नी : १८ ते ४५ वर्षे
माजी सैनिकांची पाल्ये (ESM Children) : २१ ते ३५ वर्षे

या पदासाठी उमेदवारांकडे आधार कार्ड, पॅन कार्ड,बँक पासबुक (स्वतःचे व वारसाचे),डिस्चार्ज बुक,पीपीओ, एक्स- सर्व्हिसमन आयडी (सेवानिवृत्त जवानांसाठी) तसेच मेस्को कोर्स सर्टिफिकेट (वीर नारी,पत्नी व पाल्यांसाठी) आवश्यक आहेत.

मेस्को सिक्युरिटीद्वारे राबविण्यात येणारी ही भरती प्रक्रिया माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांसाठी आर्थिक स्थैर्य व सुरक्षित भविष्याची संधी देणारी ठरणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी तात्काळ संपर्क साधावा,असे आवाहन मुंबई शहर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

संपर्कासाठी :
क्षेत्रीय व्यवस्थापक – ९९९०३१२३१२
सुरक्षा अधिकारी – ७४२०००२८३१
कार्यालयीन दूरध्वनी – ९४६६८१९८८७

Leave a Reply

Back To Top