सायबर फसवणूक झाली आहे ? तक्रार कशी व कुठे करायची – जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
डिजिटल अरेस्ट DigitalArrest OnlineFraud ऑनलाइन फसवणूक किंवा हॅकिंगची तक्रार कशी करावी ? केंद्र सरकारची अधिकृत यंत्रणा काय आहे
New Delhi news cyber awearness: नवी दिल्ली – देशात वाढत्या सायबर गुन्हेगारी, ऑनलाइन आर्थिक फसवणूक, डिजिटल अरेस्ट, सोशल मीडिया हॅकिंग आणि बनावट कॉल्सच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मात्र अशा कोणत्याही सायबर गुन्ह्याचा बळी ठरल्यास तक्रार करण्यासाठी केंद्र सरकारने अधिकृत व सुलभ व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे.सायबर गुन्ह्याची तक्रार ऑनलाइन तसेच ऑफलाइन दोन्ही पद्धतीने करता येते.
१) ऑनलाइन सायबर क्राईम तक्रार कुठे करावी?
केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाअंतर्गत चालवल्या जाणाऱ्या National Cyber Crime Reporting Portal वर नागरिक थेट तक्रार नोंदवू शकतात.
www.cybercrime.gov.in
हीच भारत सरकारची अधिकृत वेबसाइट आहे.या पोर्टलवर खालील प्रकारच्या तक्रारी करता येतात – ऑनलाइन आर्थिक फसवणूक,डिजिटल अरेस्ट,सोशल मीडिया हॅकिंग,बनावट कॉल / व्हिडिओ कॉल,OTP, KYC, लिंक फसवणूक,
महिलांविरुद्ध सायबर गुन्हे.
तक्रार नोंदवताना मोबाईल नंबर, ई-मेल, बँक तपशील, व्यवहार क्रमांक (Transaction ID) आणि पुरावे (स्क्रीनशॉट, कॉल रेकॉर्ड) अपलोड करणे आवश्यक असते.

२) सायबर हेल्पलाईन नंबर कोणता ?
सायबर आर्थिक फसवणूक झाल्यास तात्काळ 1930 या हेल्पलाईन नंबरवर कॉल करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
वेळीच तक्रार केल्यास फसवणूक झालेली रक्कम रोखण्याची शक्यता अधिक असते.
३) पोलीस ठाण्यात तक्रार करता येते का?
होय. कोणत्याही जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा सायबर पोलिस ठाण्यात थेट लेखी तक्रार दाखल करता येते.
FIR नोंदवण्याचा नागरिकांना कायदेशीर अधिकार आहे.
४) तक्रार करताना काय काळजी घ्यावी?
फसवणूक लक्षात येताच विलंब न करता तक्रार करा
कोणालाही OTP, PIN किंवा KYC माहिती देऊ नका
संशयास्पद लिंकवर क्लिक टाळा
कॉल करणाऱ्याच्या दबावाला बळी पडू नका.सायबर तज्ज्ञांच्या मते वेळीच तक्रार आणि योग्य माहिती दिल्यास सायबर गुन्हेगारांवर कारवाई शक्य होते आणि नागरिकांचे आर्थिक नुकसान टाळता येते.
सायबर फसवणूक,OnlineFraud, DigitalArrest डिजिटल अरेस्ट किंवा ऑनलाइन गुन्ह्याची तक्रार कशी व कुठे करावी?जाणून घ्या cybercrime.gov.in पोर्टल, 1930 हेल्पलाईन आणि संपूर्ण प्रक्रिया

