पारंपारिक सणांमध्ये संयम पाळताना आपली ऊर्जा चांगल्या कारणाकडे वळवण्याचा हा योग्य मार्ग – पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे

पारंपारिक सणांमध्ये संयम पाळताना आपली ऊर्जा चांगल्या कारणाकडे वळवण्याचा हा योग्य मार्ग – पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे This is the right way to divert your energy to good cause while observing Samyam in traditional festivals – Police Inspector Namdev Shinde
बारामती,जि पुणे - गणेशोत्सवाचा एक भाग म्हणून बारामती आणि वालचंदनगर पोलीस ठाण्याचेवतीने गणेशोत्सव तरुण मंडळाच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर देशात व राज्यात रक्ताचा तुटवडा भासत असल्याने या शिबिराचे बुधवार दिनांक 15 सप्टेंबर 2019 रोजी आयोजन करण्यात आले होते .

 आपल्या पारंपारिक सणांमध्ये संयम पाळताना आपली ऊर्जा चांगल्या कारणाकडे वळवण्याचा हा योग्य मार्ग आहे त्यामुळे या शिबिरात रक्तदात्यांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करावे असे आवाहन बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी केले होते त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. 

बारामती शहर पोलीस स्टेशन येथे सकाळी नऊ ते साडेपाच या वेळात हे रक्तदान शिबिर आयोजित केले होते. यावेळी पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख ,अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग मिलिंद मोहिते,पोलिस उपाधीक्षक बारामती विभाग नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी हे नियोजन केले होते.

  बारामती आणि वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी या रक्तदान शिबीर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सहकार्य केले. 

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: