ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते गौरी गणपती सजावट स्पर्धातील विजयी उमेदवारांना बक्षीस
कविता दुर्गेच्या कवयित्रींचे संमेलनचे उद्घाटन डॉ गोऱ्हे यांच्या हस्ते
पुणे,दि.०८/१०/२०२१: गौरी गणपती उत्सवात शिवसेना पुणे समन्वयक सागर पेटाडे यांच्यावतीने 'गौरी गणपती सजावट स्पर्धा' आयोजित केली होती. यातील विजयी उमेदवारांना महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते दि.०९ ऑक्टोबर,२०२१ रोजी सायं ०४ वा. सावित्रीबाई फुले स्मारक समोर,शिवसेना जनसंपर्क कार्यालय, गंज पेठ, पुणे येथे बक्षीस वितरित करण्यात येणार आहे.याचबरोबर महाराष्ट्र साहित्य परिषद आणि साहित्यादीप प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नवरात्र महोत्सवानिमित्त स्त्रीशक्ती, स्रीजाणिवा आणि स्त्रीमुक्तीच्या कवितांचा जागर 'कविता दुर्गेच्या' कवयित्रींचे संमेलनाचे उदघाटन देखील डॉ.गोऱ्हे यांच्या हस्ते सायं ०५ वा.महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माधवराव पटवर्धन सभागृह टिळक रोड, पुणे येथे होणार आहे.
या कार्यक्रमास मिलिंद जोशी कार्याध्यक्ष मसाप , प्रकाश पायगुडे-प्रमुख कार्यवाह मसाप, सुनीताराजे पवार कोषाध्यक्ष म.सा.प यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.यावेळी अंजली कुलकर्णी , प्रिया जामकर, जोत्सना चांदगुडे, मीना शिंदे, सुनीति लिमये, प्राजक्ता पटवर्धन, योगिता जोशी, प्रतिभा पवार, निरुपमा महाजन, अमिता सामंत हे सहभागी होऊन आपल्या कविता सादर करणार आहेत.