BHIM अ‍ॅप वेगळा,UPI प्रणाली वेगळी ! गोंधळ दूर करणारा खुलासा

BHIM आणि UPI मध्ये नेमका फरक काय? डिजिटल पेमेंट digital payment वापरणाऱ्यांनी जाणून घ्यायलाच हव्यात या गोष्टी

BHIM अ‍ॅप वेगळा,UPI प्रणाली वेगळी! गोंधळ दूर करणारा खुलासा

BHIM आणि UPI मधील फरक काय ? BHIM अ‍ॅप आणि UPI प्रणाली यांचा नेमका अर्थ,वापर,फायदे आणि फरक सविस्तर जाणून घ्या

नवी दिल्ली – भारतात डिजिटल व्यवहारांचे प्रमाण झपाट्याने वाढत असताना BHIM आणि UPI हे शब्द सर्वसामान्यांच्या दैनंदिन वापरात आले आहेत. मात्र अनेकदा हे दोन्ही शब्द एकाच अर्थाने वापरले जातात.प्रत्यक्षात BHIM आणि UPI यांच्यात मूलभूत फरक आहे, तो समजून घेणे प्रत्येक डिजिटल पेमेंट वापरकर्त्यासाठी महत्त्वाचे ठरते.
UPI (Unified Payments Interface) ही भारतीय राष्ट्रीय पेमेंट महामंडळाने (NPCI) विकसित केलेली डिजिटल पेमेंट प्रणाली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून कोणतेही बँक खाते, मोबाईल नंबर किंवा व्हर्च्युअल पेमेंट अ‍ॅड्रेस (VPA) वापरून तत्काळ पैसे पाठवता किंवा स्वीकारता येतात. Google Pay, PhonePe, Paytm, Amazon Pay यांसारखी अनेक अ‍ॅप्स हीच UPI प्रणाली वापरतात.

BHIM (Bharat Interface for Money) हे केंद्र सरकार आणि NPCI यांनी विकसित केलेले एक अधिकृत UPI अ‍ॅप आहे.म्हणजेच BHIM हा स्वतः UPI नाही तर UPI वर आधारित एक सरकारी मोबाईल अ‍ॅप आहे. BHIM अ‍ॅपचा मुख्य उद्देश म्हणजे नागरिकांना सुरक्षित, सोपे आणि थेट डिजिटल पेमेंटचे साधन उपलब्ध करून देणे.

BHIM अ‍ॅपमध्ये मर्यादित पण सोप्या सुविधा देण्यात आल्या आहेत तर खाजगी UPI अ‍ॅप्समध्ये कॅशबॅक,ऑफर्स, बिल पेमेंट, रिचार्ज, तिकीट बुकिंग अशा अतिरिक्त सेवा दिल्या जातात. मात्र सुरक्षितता आणि पारदर्शकतेच्या दृष्टीने BHIM अ‍ॅपवर अधिक भर दिला जातो.

तज्ज्ञांच्या मते UPI ही पायाभूत व्यवस्था असून BHIM हे त्यावरील एक सरकारी उत्पादन आहे. त्यामुळे दोन्ही एकमेकांशी संबंधित असले तरी एकसारखे नाहीत. वापरकर्त्यांनी आपल्या गरजेनुसार योग्य अ‍ॅपची निवड करणे अधिक योग्य ठरते.

Leave a Reply

Back To Top