बाळासाहेब ठाकरे जन्म शताब्दी वर्षानिमित्त एकनाथ शिंदेंकडून शिवसेना पक्ष कार्यालयात अभिवादन

बाळासाहेब ठाकरे balasaheb thakare जन्मशताब्दी वर्षानिमित्त एकनाथ शिंदेंकडून dcm Eknath Shinde शिवसेना पक्ष कार्यालयात अभिवादन

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष shivsena कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी शिवसेनेचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते

मुंबई |ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२३/०१/२०२६: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेना पक्ष कार्यालय येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब भवन येथील त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना उजाळा देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांचे हिंदुत्व, मराठी अस्मिता आणि समाजाभिमुख विचार आजही शिवसेनेसाठी मार्गदर्शक आहेत, असे सांगितले.

या अभिवादन कार्यक्रमास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उद्योग मंत्री ना.उदय सामंत,शिवसेना सचिव संजय मोरे,शिवसेना प्रवक्त्या सौ.शीतल म्हात्रे, खासदार राहुल शेवाळे यांच्यासह शिवसेनेचे लोकप्रतिनिधी,पदाधिकारी आणि असंख्य शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची ज्योत अखंड तेवत ठेवण्याचा संकल्प यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी केला.

जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यभर विविध सामाजिक, सांस्कृतिक व संघटनात्मक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

Leave a Reply

Back To Top