स्वेरीत राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात साजरा: विद्यार्थ्यांनी लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची घेतली शपथ

स्वेरीत sveri राष्ट्रीय मतदार दिन National voters day उत्साहात साजरा: विद्यार्थ्यांनी लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची घेतली शपथ

पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर येथील स्वेरी संस्थेत राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ घेतली. युवकांना मतदानाबाबत जागरूक करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन.

Pandharpur sveri news: पंढरपूर |ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२५ जानेवारी २०२६ : महाराष्ट्र शासन व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या निर्देशानुसार गोपाळपूर ता.पंढरपूर येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (स्वेरी) येथे राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

या निमित्ताने रविवार दि.२५ जानेवारी २०२६ रोजी आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ देण्यात आली.भारत हा युवकांचा देश असून १८ वर्षे पूर्ण केलेल्या नवमतदारांमध्ये लोकशाही मूल्यांची जाणीव निर्माण करणे, त्यांना मतदान प्रक्रियेत सक्रिय सहभागासाठी प्रवृत्त करणे व राष्ट्रउभारणीत योगदान देण्यासाठी प्रेरित करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

मतदान हे नागरिकांचे मूलभूत कर्तव्य असून, लोकशाही बळकट करण्यासाठी युवकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. यासाठी विद्यार्थ्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करणे, मतदानाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि लोकशाही मूल्यांप्रती निष्ठा वाढविण्यासाठी स्वेरीमध्ये हा मतदार जनजागृती उपक्रम राबविण्यात आला.या कार्यक्रमात शपथेचे वाचन डॉ. यशपाल खेडकर यांनी केले.

या कार्यक्रमासाठी राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ.विनोद मोहितकर,सौ.मोहितकर,ॲड.ज्ञानेश आराध्ये, सौ. माधुरी गवंडी, स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) चे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे, विश्वस्त एच. एम. बागल, बी. डी. रोंगे, स्वेरीचे सचिव डॉ. सुरज रोंगे, कॅम्पस इन्चार्ज डॉ.एम.एम.पवार, बी.फार्मसी चे प्राचार्य डॉ. मिथुन मनियार, डिप्लोमाचे प्राचार्य डॉ.एन.डी. मिसाळ, डी.फार्मसीचे प्राचार्य प्रा.सतीश मांडवे, इंजिनिअरिंगच्या उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार,विद्यार्थी अधिष्ठाता डॉ.महेश मठपती, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. ए. बी. चौंडे, रासेयोचे अधिकारी, स्वयंसेवक, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांबाबत सकारात्मक जागृती निर्माण झाली असून, जबाबदार नागरिक घडविण्याच्या दिशेने हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरला.

Leave a Reply

Back To Top