वाळू तस्कर सुरज उर्फ अंबान्या पवार MPDA अंतर्गत येरवडा जेलमध्ये

वाळू तस्कर सुरज उर्फ अंबान्या पवार MPDA अंतर्गत स्थानबद्ध; एक वर्षासाठी येरवडा कारागृहात रवानगी

वाळू तस्कर सुरज उर्फ अंबान्या पवार MPDA अंतर्गत येरवडा जेलमध्ये

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज : पंढरपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या वाळू उपसा करून बेकायदेशीर विक्री करणारा सराईत वाळू तस्कर तसेच शरीराविषयक गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेला सुरज उर्फ अंबान्या दत्तात्रय पवार रा.फूट रस्ता कोर्टी, ता.पंढरपूर, जि.सोलापूर याला एमपीडीए (MPDA) कायद्यांतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले असून त्याची येरवडा सेंट्रल तुरुंगात Yerwada Central Prison रवानगी करण्यात आली आहे.

पंढरपूर शहर परिसरात अवैधरित्या वाळू चोरी करून तिची विक्री करणे, नागरिकांना दमदाटी करणे, मारहाण करणे तसेच वाळूच्या वादातून जीवघेणे हल्ले करणे अशी गंभीर कृत्ये सुरज पवार करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याच्यावर वाळू तस्करी तसेच शरीराविरुद्धचे अनेक गुन्हे दाखल असून अटक झाल्यानंतरही तो जामिनावर सुटून पुन्हा अवैध व्यवसाय सुरू करत होता.
तसेच त्याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता Bharatiya Nyaya Sanhita अंतर्गत गुन्हे नोंद असून टेंभुर्णी पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गंभीर गुन्हाही दाखल आहे. त्यामुळे कायद्याचा धाक न बाळगणारा व परिसरात दहशत निर्माण करणारा धोकादायक व्यक्ती म्हणून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात आली.

या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे Dashrath Waghmode यांनी एमपीडीए Maharashtra Prevention of Dangerous Activities Act अंतर्गत स्थानबद्धतेचा प्रस्ताव सादर केला होता. हा प्रस्ताव पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे पाठविण्यात आला होता. त्यानंतर आदेश जारी करून सुरज पवार याला ताब्यात घेऊन येरवडा मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले.

सदरची कामगीरी ही सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी (भा.पो.से),अप्पर पोलीस अधिक्षक प्रितमकुमार यावलकर,पंढरपूर विभागाचे सहा.पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे (भा.पो.से) पंढरपूर विभाग पंढरपुर पोलीस निरीक्षक संजय जगताप, स्थानिक गुन्हे शाखा,सोलापुर ग्रामीण वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे, पंढरपूर शहर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली सपोफौ कल्याण ढवणे, पो.ना.सचिन इंगळे,सचिन हेंबाडे,दिपक नवले,हर्षद ठाकर ,स्थानिक गुन्हे शाखेचे अनिस शेख तसेच सायबर सेलचे रतन जाधव यांनी केली आहे.

पंढरपूर शहर परिसरातील वाळू तस्कर आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींविरोधात अशाच प्रकारच्या कठोर कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Back To Top