पंढरपूर MIDC चा प्रश्न तत्काळ मार्गी लावावा – उद्योगमंत्री उदय सामंत

पंढरपूर MIDC चा प्रश्न तत्काळ मार्गी लावावा – उद्योगमंत्री उदय सामंत

Uday Samant उदय सामंत यांचे आदेश : पंढरपूर MIDC चा प्रश्न तत्काळ मार्गी लावा; Samadhan Avatade यांचा पाठपुरावा

पंढरपूर MIDC ला गती: उद्योगमंत्री उदय सामंत यांचे अधिकाऱ्यांना तत्काळ आदेश

Mumbai news: मुंबई – पंढरपूर एमआयडीसी मार्गी लागण्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच सूचना केल्या आहेत.पंढरपूर एमआयडीसीच्या बाबतीत लवकरात लवकर मार्गी लावण्याकरिता संबंधित अधिकाऱ्यांनी मर्यादित वेळेत हा विषय सोडवा, अशा सूचना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एमआयडीसीच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे आमदार समाधान आवताडे यांनी पंढरपूर एमआयडीसीच्या संदर्भात विधान भवन मुंबई येथे अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान उद्योग मंत्री उदय सामंत त्यांच्याकडे पाठपुरावा करण्याकरिता बैठकीत केलेला पाठपुरावा आणि वस्तुस्थिती मांडली.

आमदार समाधान आवताडे यांनी पंढरपूर MIDC (महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ) संदर्भात सातत्याने आणि पाठपुरावा केला आहे. हा प्रश्न तब्बल ४० वर्षांपासून प्रलंबित होता,ज्यामुळे पंढरपूर -मंगळवेढा मतदारसंघातील तरुणांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी ते प्रयत्नशील आहेत.

आमदार समाधान आवताडे यांनी उद्योग मंत्रालय, MIDC अधिकार्‍यांशी सातत्याने संपर्क साधून, बैठका घेऊन आणि अखंड पाठपुरावा करून कासेगाव ता.पंढरपूर येथे MIDC साठी यापूर्वी मंजुरी मिळवली आहे.यामध्ये ऑगस्ट २०२४ मध्ये उद्योग मंत्रालयाने ५४ एकर जमीन औद्योगिक क्षेत्र म्हणून घोषित केली. याबाबत अध्यादेश काढण्यात आला, ज्यामुळे MIDC उभारणीला गती मिळाली.

दरम्यान, अर्थसंकल्प अधिवेशनात झालेल्या बैठकीत पंढरपूर एमआयडीसी हा विषय मार्गी लावण्याचे आदेश उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिले. यावेळी एमआयडीसीचे सर्व अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Back To Top