Pandharpur पंढरपूर बस स्थानकावर दुचाकींसाठी अद्ययावत वाहनतळ उभारण्याची मागणी:सामाजिक कार्यकर्ते यशवंत डोंबाळी यांचा आवाज
पंढरपूर बस स्थानकात दुचाकी पार्किंगची समस्या; वाहनतळ उभारण्याची मागणी
Pandharpur st bus stand news : पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर बस स्थानक परिसरात दुचाकी वाहनांसाठी योग्य पार्किंग सुविधा नसल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.भाविकांनाही अडथळा निर्माण होत असून त्यांच्या जिवीतालाही धोका संभवतो आहे. त्यामुळे या समस्येवर तातडीने उपाययोजना करून अद्ययावत वाहनतळ उभारण्यात यावा,अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व माहिती अधिकार कार्यकर्ते यशवंत जगन्नाथ डोंबाळी यांनी केली आहे.
पंढरपूर बस स्थानकात दुचाकी वाहनांसाठी अपुरी जागा उपलब्ध असल्यामुळे नागरिक आपली वाहने कुठेही उभी करतात. त्यामुळे बस स्थानकात येणाऱ्या प्रवाशांना प्रवेश करताना अडथळे निर्माण होतात. अनेक प्रवासी प्रवासासाठी बाहेर जाताना आपली दुचाकी बस स्थानक परिसरातच लावून जातात.

याशिवाय बस स्थानकाच्या इमारतीमध्ये बँका,दवाखाने आणि विविध दुकाने असल्यामुळे परिसरात नेहमीच दुचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. त्यामुळे बस स्थानकातील वाहतूक व्यवस्थेवरही परिणाम होत असल्याचे दिसून येते.
या पार्श्वभूमीवर Maharashtra State Road Transport Corporation ने पंढरपूर बस स्थानकात दुचाकी वाहनांसाठी सुरक्षित,बंदिस्त आणि विनामूल्य वाहनतळ उभारावा यामुळे प्रवाशांची सोय होण्याबरोबरच वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, असेही यशवंत डोंबाळी यांनी नमूद केले आहे.





