इराण युद्ध संपण्याच्या दिशेने ? ज्येष्ठ पत्रकार विनय जोशी यांचे मनोगत

इराण युद्ध संपण्याच्या दिशेने ? ज्येष्ठ पत्रकार विनय जोशी यांचे मनोगत

जगदीश का.काशिकर,मुक्त पत्रकार मुंबई,महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

इराण-इस्रायल युद्ध थांबण्याच्या उंबरठ्यावर ? ट्रम्प–पुतिन फोन कॉलनंतर जागतिक राजकारणात नवा टर्न

ट्रंप आणि पुतिन यांच्यात दीर्घ फोन कॉल झाला यात नेहमीप्रमाणे आम्ही हे केलं, ते केलं! वगैरे गोष्टी ट्रम्पने सांगितल्या. इराणवर रशियन प्रभाव मोठा आहे, सध्याच्या युद्धात रशियन इंटेलिजन्स एजन्सी इराणी सैन्याला बहुमूल्य माहिती आणि मिसाईल, ड्रोन्ससाठी कटिंग एज टार्गेट अक्विझिशन यंत्रणा देत आहेत. त्यामुळे इराणला युद्ध थांबवण्यासाठी पुतिन जास्त योग्यपणे पटवू शकतात असा अमेरिकेचा अंदाज असावा.

ट्रम्पच्या तुलनेत पुतिन कित्येक पटीने धूर्त, धोरणी आणि पोचलेला राजकारणी आहे. युक्रेन युद्धापासूनचे रशियावरील निर्बंध आणि त्याने झालेलं क्रूड व्यापारातील नुकसान हे भरून निघाल्याशिवाय तो हे युद्ध थांबू देणार नाही. सध्या वाढलेल्या जागतिक क्रूड दरापेक्षा जास्त किंमत सध्या पुतिन वसूल करून घेत आहे.

हॉर्मुझ न उघडल्यास काल ट्रम्पने वीस पट मोठे हल्ले करायची धमकी दिल्यावर इराणी सैन्याने एक लिटर क्रूड तेल हॉर्मुझ मधून बाहेर जाऊ देणार नाही असं प्रत्युत्तर दिल्याने कोणत्याही मार्गाने युद्ध थांबवण्याची गरज आता अमेरिकेला आहे.वाढत्या तेल,गॅस दरांमुळे आणि कोसळत्या शेयर बाजारामुळे अमेरिकन उद्योग जगताचा ट्रम्पवर दबाव आहे.

इस्रायल आणि इराणमध्ये या युद्धात जबर नुकसान झालं आहे. इस्रायल मध्ये इराण आणि हिजबुल्लाच्या मिसाईल हल्ल्यात २००० च्या वर नागरिक जखमी आहेत आणि मृतांचा आकडा इस्रायली सरकारच्या कुलूपात बंद आहे. इराणमध्ये १५०० ठार आणि २००० जखमी आहेत. दोन्ही देशात पायाभूत सुविधांचं नुकसान खूप आहे.

अरब जगतात जवळपास एकही अमेरिकन बेस इराणी सैन्याने अस्पर्शित ठेवलेला नाही,कित्येक अरब रिफायनरींवर इराणी सैन्य नित्याने हल्ले करत आहे, यांचा उद्देश रिफायनरी उद्ध्वस्त करण्यापेक्षा उत्पादन बंद करायला लावणं आणि जगातील कोणतीही कंपनी त्यांना इन्शुरन्स कव्हर देणार नाही याचा बंदोबस्त करणं हा आहे.

सौदी अरेबियामध्ये अमेरिकन दूतावास बंद केल्यानंतर आता तेथील अमेरिकन सैन्याचे लढाऊ विमानात हवेतल्या हवेत इंधन भरणारे टँकर्स युरोपियन देशात हलवले आहेत.इराणी सैन्याने अरब देशांना हॉर्मुझ मधून तेल नेऊ देण्याची परवानगी देऊ केली आहे पण त्यासाठीची अट आहे आपापल्या देशातून अमेरिकन आणि इस्रायली डिप्लोमेट्स हाकलून द्या! ही अट सध्या मान्य होण्यातील नाही.

इराणी मिसाईल हल्ल्यात अरब देशातील जवळपास सर्व अत्याधुनिक अमेरिकन रडार उध्वस्त झाल्याने पूर्वी इराणी मिसाईल जमिनीवरून उडाल्यावर लगेच इस्रायल मध्ये अर्ली वॉर्निंग सिस्टम सुरू होत होत्या त्या आता थेट मिसाईल पोचेपर्यंत सुरू होत नाहीत त्यामुळे जीवितहानी वाढत आहे.

आता ट्रम्प एकतर्फी विजय घोषित करून यातून बाहेर पडतो का अमेरिकन जनता, उद्योग व्यापार जगत यांना बाजूला ठेऊन आणखी हल्ले करतो हे बघावं लागेल ?

Leave a Reply

Back To Top