सरकारने ओटीटी प्लॅटफॉर्म्ससाठी सुलभता मार्गदर्शक तत्त्वे केली जारी; श्रवण आणि दृष्टीबाधित प्रेक्षकांसाठी विशिष्ट सुविधा केल्या अनिवार्य
OTT प्लॅटफॉर्मसाठी नवे नियम लागू : श्रवण व दृष्टीबाधित प्रेक्षकांसाठी कॅप्शन आणि ऑडिओ सुविधा अनिवार्य
नवी दिल्ली, 27 मार्च 2026 – माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 06.02.2026 रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. यानुसार ऑनलाइन माध्यमातून प्रसारित केली जाणारी आशय-सामुग्री श्रवण आणि दृष्टीदोष असलेल्या व्यक्तींपर्यन्त सुलभतेने पोहोचवणाऱ्या विशिष्ट सुविधा अनिवार्य केल्या आहेत.
ही मार्गदर्शक तत्वे मंत्रालयाच्या संकेतस्थळावर जनतेसाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी पुढील टप्पे आहेत: https://mib.gov.in → Home →Documents →कायदे, धोरणे आणिमार्गदर्शक तत्वे

ओटीटी प्लॅटफॉर्मवरील दृकश्राव्य आशय श्रवण आणि दृष्टीबाधित असलेल्या व्यक्तींना सुलभतेने समजेल, याची खात्री करणे, आणि त्यासाठी अंमलबजावणीचे वेळापत्रक उपलब्ध करून देणे, हे या मार्गदर्शक तत्त्वांचे उद्दिष्ट आहे.
या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ओटीटी प्लॅटफॉर्मवर नव्याने प्रसारित होणाऱ्या सर्व आशय-सामग्रीमध्ये श्रवण दोष असलेल्या व्यक्तींसाठी (क्लोज्ड कॅप्शनिंग / ओपन कॅप्शनिंग/ इंडियन साइन लँग्वेज) आणि दृष्टी दोष असलेल्या व्यक्तींसाठी (ऑडिओ डिस्क्रिप्टर) यापैकी किमान एक वैशिष्ट समाविष्ट करणे बंधनकारक असून, त्याच्या अंमलबजावणीचे वेळापत्रक देणे गरजेचे आहे.
माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी राज्यसभेत माया नरोलिया यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ही माहिती दिली.





