पंढरपूर पंचायत समितीस जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांची भेट;विकास कामांचा घेतला आढावा,विठ्ठल दर्शनही घेतले
पंढरपूर पंचायत समितीस उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांची भेट..

पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज- सोलापूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी आज सकाळी 9.45 वाजता पंढरपूर पंचायत समितीस भेट दिली. 31 मार्च च्या कामाच्या व्यापानंतरही पंचायत समितीचे सर्व कर्मचारी वेळेत हजर असल्याचा प्रत्यय उपाध्यक्ष पवार यांना आला.

पंढरपूर पंचायत समितीस उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी भेट देऊन आषाढी यात्रा व पंचायत समिती मधील विकास कामांची माहिती व आढावा घेतला.या प्रसंगी उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांचे स्वागत गटविकास अधिकारी अमोल जाधव यांनी केले. यावेळी उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी पंचायत समिती परिसराची पाहणी केली. गटविकास अधिकारी अमोल जाधव यांनी राबविलेले विविध नाविन्यपूर्ण उपक्रमाची पाहणी केली.क्लीन व ग्रीन उपक्रम राबवून पंचायत समिती हरित केली आहे. परिसराची स्वच्छता व वृक्षारोपण पाहून उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी पंचायत समितीचे कौतुक केले.

उपाध्यक्ष पवार यांनी घेतले विठ्ठलाचे दर्शन
जिल्हा परिषदेचे नूतन उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात जाऊन श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे दर्शन घेतले.याप्रसंगी मंदिर समितीचे विभाग प्रमुख राजेंद्र सुभेदार यांनी मंदिर समिती च्यावतीने उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांचे महावस्त्र देऊन स्वागत केले.गटविकास अधिकारी अमोल जाधव,पंचायत समितीचे अधिक्षक शहाजहान तांबोळी, भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष विनायक सुतार, भारतीय जनता पार्टी उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष संभाजी दडे आदी उपस्थित होते.


