समितीने सुचविलेल्या शिफारशीनुसार अपशिंगे (मिलिटरी) गावाचा विकास करणार – माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे

समितीने सुचविलेल्या शिफारशीनुसार अपशिंगे (मिलिटरी) गावाचा विकास करण्यात येईल असे माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे Dadaji Bhuse, Ex-Servicemen’s Welfare Minister

मुंबई दि.२२ :- सातारा जिल्ह्यातील सैनिकी परंपरा लाभलेल्या अपशिंगे (मिलिटरी) गावाचा इतिहास संपूर्ण जगासमोर आणण्याच्या दृष्टीने संग्रहालय निर्मिती व त्या अनुषंगाने प्रस्तावित पायाभूत सुधारणा सुचविण्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार असून समितीने सुचविलेल्या शिफारशीनुसार अपशिंगे (मिलिटरी) गावाचा विकास करण्यात येईल असे माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.मंत्री श्री.भुसे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात माजी सैनिक कल्याण विभागाच्या कामाचा आढावा घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

पहिल्या महायुद्धाच्या काळात अपशिंगे या गावातील ९० टक्के लोक सैन्यात सहभागी झाले होते.या गावाने अनेक वीर सैनिक दिले.त्याचा इतिहास जतन करण्याची गरज आहे.त्या अनुषंगाने संग्रहालयाची निर्मिती,ग्रंथालय,स्टेडियम,प्रशिक्षण संस्था व पायाभूत सुविधा निर्माण करण्यात याव्यात.त्यासाठी जागेची पाहणी करावी.कृषी विभागाच्या वतीने तेथील शेतकऱ्यांना सर्व योजनांचा लाभ देण्यात यावा असे निर्देशही श्री.भुसे यांनी दिले.

सैन्यभरती मेळावे
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेली दोन वर्षे सैन्यभरती बंद होती.ती पुन्हा सुरू करावी .त्यासाठी राज्यात विविध ठिकाणी सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.धुळे येथील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या आवारात माजी सैनिक व त्यांच्या परिवारासाठी बहुउद्देशीय सभागृह बांधकामाची सद्यस्थिती, सैनिक कल्याण विभागाचे संचालक, उपसंचालक पदांचे सुधारित सेवा प्रवेश नियम आदि बाबींवरही या बैठकीत चर्चा करण्यात आली.


यावेळी सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव सीमा व्यास,सैनिक कल्याण विभाग पुणे चे संचालक प्रमोद यादव,सैनिक कल्याण विभाग पुणे उपसंचालक ले.कर्नल (निवृत्त) आर. आर. जाधव,सातारा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजयकुमार पाटील, निवृत्त ब्रिगेडियर मोहन निकम उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: