कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या ऋतुजा धुमाळची १० मीटर पिस्टल शूटिंगमध्ये राष्ट्रीय पातळीवर निवड
कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाची विद्यार्थिनी नेमबाजी राष्ट्रीय स्पर्धेमध्ये ऋतुजा धुमाळची यशस्वी झेप
कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालया च्या बी.कॉम विद्यार्थिनी ऋतुजा धुमाळची मेरठ येथे होणाऱ्या आंतर विद्यापीठ १० मीटर पिस्टल शूटिंग राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
Pandharpur news sports:पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७/०१/२०२६ : येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयातील बी.कॉम भाग दोन मधील विद्यार्थिनी ऋतुजा धुमाळ हिची उत्तर प्रदेशातील मेरठ येथे होणाऱ्या आंतरविद्यापीठ १० मीटर पिस्टल शूटिंग या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाच्या वतीने तिचा गौरव करण्यात आला.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.टी.जाधव यांच्या हस्ते ऋतुजा धुमाळ हिचा सत्कार करण्यात आला. यावेळी अधिष्ठाता डॉ.बी.एस.बळवंत,कॉमर्स विभागाच्या प्रा. (डॉ.) सारिका केदार, शारीरिक शिक्षण संचालक प्रा.अनिल परमार, प्रा. विठ्ठल फुले तसेच प्रा.मनोज खपाले उपस्थित होते.
ऋतुजा हिला मार्गदर्शक प्राध्यापकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून तिच्या सातत्यपूर्ण सराव,मेहनत आणि जिद्दीचे हे यशस्वी फलित असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या निवडीबद्दल प्राचार्यांसह उपप्राचार्य, विभागप्रमुख, प्राध्यापक तसेच शिक्षकेतर सेवक वर्गाने तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

