डिजिटल जनगणना 2027 ची तयारी वेगात; नागरिकांनी ऑनलाईन माहिती भरावी – प्रशासनाचे आवाहन

मंगळवेढा तालुक्यात 1 मे 2026 पासून डिजिटल जनगणना मोहिमेला सुरुवात; नागरिकांना स्वयनोंदणीची सुविधा, दोन टप्प्यांत होणार प्रक्रिया, गोपनीयतेची हमी.

मंगळवेढा उच्च तालुक्यात 1 मेपासून डिजिटल जनगणना; स्वयनोंदणीसह दोन टप्प्यांत प्रक्रिया

डिजिटल जनगणना 2027ची तयारी वेगात; नागरिकांनी ऑनलाईन माहिती भरावी – प्रशासनाचे आवाहन

मंगळवेढा ज्ञानप्रवाह न्यूज : केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार मंगळवेढा तालुक्यात 1 मे 2026 पासून डिजिटल जनगणना मोहिमेला प्रारंभ होणार आहे. 2027 साली होणारी ही जनगणना पूर्णपणे डिजिटल पद्धतीने पार पडणार असून, तालुक्यात प्रथमच अशा स्वरूपात ही प्रक्रिया राबवली जात आहे.

जनगणनेचा पहिला टप्पा 1 मे ते 15 मे 2026 या कालावधीत होणार आहे. या दरम्यान नागरिकांना स्वयनोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.नागरिकांनी अधिकृत संकेत स्थळावर जाऊन 34 प्रश्नांची माहिती भरायची असून, नोंदणी पूर्ण झाल्यानंतर मिळणारा युनिक कोड पुढील टप्प्यात सादर करणे आवश्यक आहे.

दुसरा टप्पा 16 मे ते 14 जून 2026 दरम्यान पार पडणार असून यामध्ये प्रगणक घरोघरी जाऊन माहिती संकलित करतील. स्वयनोंदणी केलेल्या नागरिकांना फक्त युनिक कोड देऊन प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. या जनगणनेत नागरिकांची वैयक्तिक माहिती,कुटुंब रचना,घराचा प्रकार,सदस्यांची संख्या याची नोंद केली जाणार आहे.

प्रशासनाने स्पष्ट केले आहे की,संकलित माहिती केवळ सांख्यिकी उद्देशासाठी वापरली जाईल आणि नागरिकांच्या गोपनीयतेची पूर्ण हमी दिली जाईल. सध्या तालुकास्तरावर पर्यवेक्षक व प्रगणकांचे प्रशिक्षण सुरू असून, कामकाजासाठी 59 पर्यवेक्षक आणि 314 प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भारतात जनगणनेची परंपरा 1872 पासून सुरू असून ही जनगणना स्वातंत्र्यानंतरची आठवी जनगणना ठरणार आहे.

प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, प्रगणक घरी आल्यानंतर आवश्यक माहिती देऊन सहकार्य करावे तसेच स्वयंनोंदणीचा लाभ घेऊन राष्ट्रीय कार्यात सक्रिय सहभाग नोंदवावा.

#DigitalCensus2026, #Manglwedha ,#Janaganana, #DigitalIndia, #Census2027, #MaharashtraNews, #OnlineRegistration, #BreakingNews, #LocalNews, #GovernmentUpdate, dnyanpravahnews,

Leave a Reply

Back To Top